पुणे : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील (Mumbai Cruise Drug Case)  एनसीबीचे (NCB)  वादग्रस्त पंच किरण  गोसावीला (Kiran Gosavi) आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावींवर आहे. 


किरण गोसावी विरुद्ध ठाणे,  कळवा,  अंधेरी,  पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.   किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. यामध्ये अनेकांची मोठी फसवणूक झाली आहे.  त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांची मागणी केली होती. 


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला नवे वळण? किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे व्हाट्सअप चॅट 'माझा'च्या हाती


क्रूझ ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी चर्चेत


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने आर्यन खानला सोडवण्याच्या बदल्यात शाहरूख खानकडून 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याचा पंच प्रभाकर साईल यानं केला आहे. तसेच किरण गोसावीवर पुण्यामध्ये गुन्हे नोंद असून गेले बरेच दिवस पुणे पोलीस त्याच्या शोधात होते.


 



दरम्यान, गोसावी लखनौमध्ये असल्याचं समजताच पुणे पोलिसांचं पथक तात्काळ रवाना झालं होतं. मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार राहिलेल्या गोसावी याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पुणे पोलीस त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले होतं. परंतु, किरण गोसावीनं  (Kiran Gosavi) पुणे पोलिसांना उत्तर प्रदेशमध्येही गुंगारा दिला होता. पुणे पोलिसांच्या दोन पथकांकडून किरण गोसावीचा उत्तर प्रदेशमध्ये तपास सुरु होता. गोसावीचं शेवटचं लोकेशन यूपीतील फत्तेपूरमध्ये असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. तसेच, किरण गोसावी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून तो सातत्याने त्याचं लोकेशन बदलत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती. 


Sameer Wankhede : आम्हाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर