एक्स्प्लोर

Maharashtra Rain Weather Updates: राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

Maharashtra Rain Weather Updates: पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होईल. मात्र त्यानंतर पाऊसाचा जोर कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली.

Maharashtra Rain Weather Updates: पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः मुंबईतील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, अवघ्या 24 तासांत 200 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पुढील 72 तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज आहे. 

मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत असून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आकाश ढगाळ आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील काही तासांतही मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याचदरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होईल. मात्र त्यानंतर पाऊसाचा जोर कमी होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. (Maharashtra Rain Weather Marathi News)

6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल- (Maharashtra Weather Updates)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे. घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची परिस्थिती सध्या चांगली आहे. 6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल. राज्यात इतर भागात पावसाची तीव्रता कमी आहे, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. 

राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद- (Satara Mahabaleshwar Rain News)

राज्यात सर्वदूर पाऊस आहे, मात्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा आहे. आगामी तीन ते चार दिवस मुंबईत पावसाची स्थिती आहे आणि तशीच राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली. राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे, असंही एस.डी. सानप म्हणाले. 

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुण्याला उद्या रेड अलर्ट- (Palghar Thane Raigad Pune Rain Marathi News)

मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबईमध्ये दोन ते तीन दिवस पाऊस कोसळत राहणार आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई रायगड, पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यात तसेच सातारा या भागात रेड अलर्ट असणार आहे. 

मुंबईसह उपनगरांना उद्या रेड अलर्ट- (Mumbai Rain Updates)

मुंबईत सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार, ४ जुलैसाठी मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या ताज्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. हा इशारा 'Very Likely' म्हणजेच अत्यंत शक्य असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला असून, पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सखल भाग, समुद्रकिनारा आणि झाडांच्या परिसरात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातमी:

Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget