Maharashtra Rain Update : पावसाळा (Rain) सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 24 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 458.4 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात 485.10. मिमी पाऊस कोसळला आहे. यामध्ये कोकणात (Konkan) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागानं (imd) दिली आहे.
आठ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
आत्तापर्यंत कोकणात 123 टक्के, विदर्भात 108 टक्के, मराठवाड्यात 96 टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 90 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे. तर आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मात्र, सात जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. यामध्ये सांगली, हिंगोली, सोलापूर, सातारा, जालना, अहमदनगर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: