Maharashtra Rain : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा हाहाकार  (Heavy Rain) असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra Rain) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयता आजच्या हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती. 


कुठं कुठं पडणार पाऊस?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ठाणे पालघरसह कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. तसेच गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 



आपत्ती निवारण विभागासमोर मोठी आव्हाने


पुणे शहर परिसरात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आपत्ती निवारण विभागासमोर मोठी आव्हाने येत आहेत. खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी ओसरलं आहे. मात्र, पाणी ओसरणं हे तात्पुरतं ठरू शकतं असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितलंं आहे. पाऊस सुरू आहे त्यामुळे विसर्ग वाढवला तर पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. पुन्हा एकदा सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याबाबत कोणत्या उपाययोजन करता येतील त्याबाबत बैठक सुरू आहे. या बैठकीला पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पालिका आयुक्त यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 


दरम्यान, या पावसामुळं पुण्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. प्रशासनाते बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, आजही पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.



महत्वाच्या बातम्या:


उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वेगानं, कोणत्या धरणातून किती विसर्ग? शेतकऱ्यांची चिंता मिटणार