Maharashtra Weather : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात दामदार पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. असेच काहीसे चित्र आता विदर्भात देखील बघायला मिळत आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट तर गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


 'या' जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा


हवामान विभागाने वर्धा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 19 आणि 20 जुलै रोजी वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास वर्धा, वना, बोर, पोथरा, यशोदा, धाम नदी, लाल नाला आदी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन पाणलोट क्षेत्रात नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, तसेच इशारा कालावधीत पर्यटन स्थळावर गर्दी करू नये. सोबतच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवाही पसरवू नये.घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ जिल्हा किंवा तालुका नियंत्रण कक्षाला  द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे.


गडचिरोली जिल्ह्याला पाऊसाचा रेड अलर्ट


अशीच काहीशी परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात देखील बघायला मिळत आहे. आज अवमान खात्याने  गडचिरोली जिल्ह्याला पाऊसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काल रात्री पासून काही भागात मध्यम स्वरूपाचं पाऊस पडतो आहे. तर काही ठिकाणी पाऊसाच जोर अधिक आहे. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री पाऊसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सिरोंचा तालुका मुख्यालय परिसरातील काही भागासह एका मुलांच्या हॉस्टेमध्ये देखील पाणी शिरलं होत. त्यामुळे अनेक विद्यार्थी तिथे अडकले होते. मात्र त्यांना पोलिसांच्या बचाव पथकाने तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलं. तर सिरोंचापासून अगदी जवळ 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्यपल्ली गावात तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे तलावाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे गावात पाणी शिरलय. यात 15 हुन अधिक घरात पाणी शिरलं होतं, सध्या त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे.  


सद्या जिल्ह्यातील पावसामुळे बंद मार्ग 


1. आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कडकेली नाला)
2. एटापल्ली – गट्टा अलगंडी रस्ता (बांडीया नदी)
3. चौखेवाडा- एटापल्ली- आलापल्ली राज्यमार्ग (एटापल्ली जवळ स्थानिक नाला)


जिल्ह्यातील पर्जन्यमान (मि.मी.)


19 जुलै, 2024 चे सकाळी 8.30 वाजता चे नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी 52.0 मि.मी. पाऊस झालेला आहे, 40 पैकी 13 मंडळामध्ये अतिवृष्टी ची नोंद झालेली  असुन सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळमध्ये सर्वाधिक 270.8 मि.मी. पावसाची नोंद आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या