Maharashtra Rain LIVE Update | अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका

Maharashtra Rain LIVE Update | राज्यभरातील, प्रत्येक शहरातील, गावा खेड्यातील पावसासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पावसामुळे ट्रॅफिक जॅम (Traffic on Pune Solapur Highway) झालं आहे. तर पुण्यातही सकाळी पावसाने उसंत घेतली तरी रात्रभर पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामुळे पुण्यातही अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक भागांत ट्रॅफिक जॅम (Pune traffic Update) झालं आहे. याशिवाय इंदापूर (Indapur), पंढरपूर (Pandharpur), सांगली (Sangali) या भागांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Oct 2020 03:27 PM
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका; राज्यात पावसामुळे 28 जणांचा मृत्यू झाल असून एक जण बेपत्ता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 57 हजार 354 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय. ऊस, सोयाबीन, भात कापूस, तूर, भाजीपाला, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये 2319 घराची पडझड झाली आहे, सगळ्यात जास्त फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. सोलापुरात 34 हजार 788 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले तर 1716 घरांची पडझड झाली आहे. 513 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झालाय.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीबाबत भाष्य केलंय. त्या म्हणाल्या, अतिवृष्टीग्रस्ताच्या केंद्रीय मदतीसाठी पंतप्रधानाकडे प्रयत्न करू, पुण्यातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढ्याची वर्क ऑर्डर दोन दिवसात काढणार, लवकरच हा विषय मार्गी लागणार
, पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षात पूर परस्थिती निर्माण होतेय आणि त्यामुळे याला आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नाही , सुरक्षा भिंत दोन वर्षांपूर्वी पडली आणि अजूनही त्याच काम पूर्ण झालं नाही तर यामध्ये २५ वर्षाचा हिशोब होऊ शकतो असा प्रतिप्रश्न महापौराना विचारालाय,टीका करावी पण काम ही करावे, चंद्रकांत पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयक साठी रॅली काढली त्याच भागात त्यांच्या विचाराचा साखर कारखाना बंद आहे. पवार कुटूंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाईन्स होत नाहीत, कोणीही यावं आणि मनमोकळ करावं आम्ही दिलदार आहोत, एकनाथ खडसे प्रवेशाबाबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सांगली जिल्ह्यातील पावसाचा ओसरलेला जोर आणि कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळी 35 फुटावर स्थिरावली आहे. काल रात्री कृष्णा नदीचे पाणी पातळी 36 फुटाच्या वर गेली होती यामुळे आज सकाळपर्यंत कृष्णा नदी 40 फुटाची इशारा पातळी ओलांडून अशी शक्यता व्यक्त केली जात होती . मात्र पावसाचा जोर ओसरला आणि कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने आता कृष्णा नदीचे पाणी पातळी 36 फुटावरून हळूहळू कमी होऊ लागली आहे. यामुळे कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी अजूनही ढगाळ वातावरण कायम असून पावसाची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
सांगली : जिल्ह्यात परतीच्या पावसात पूर्व भागातील नद्याच्या पुलावरून आतापर्यंत 9 जण वाहून गेले आहेत.यातील 6 जणांचे मृतदेह सापडले तर 3 जणांचा शोध सुरु आहे. तर महापालिका क्षेत्रातील 300 हुन अधिक लोकांचे स्थलांतर काल करण्यात आले होते.
सोलापूर : मोहोळ तालुक्यात सीना आणि भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री पासून अनेकांना पोलिसांनी स्थलांतरित केलं आहे. नदी काठच्या गावात जिथे लोक अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.
माण तालूक्यातील शिखर शिंगणापूर परिसरात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने तलाव ओवरफ्लो. पुष्कर तलाव ओवरफ्लो झाल्याने गावात पाणी शिरले आहे. दरम्यान, पाऊसाचा जोर कमी झाल्याने गावात आलेले पाणी ओसरल्याने ग्रामस्थांचा जिव भांड्यात.
पंढरपुरातल्या तिन्ही महत्वाच्या पुलावर पाणी. सोलापूरहुन पंढरपूर शहरात पूर्ण वाहतूक खोळंबली. जवळपास एक तासापासून अहिल्यादेवी, चंद्रभागा आणि जुना दगडीपूल वाहतुकीसाठी बंद. पंढरपूरच्या वेशीवर अनेक गाड्या थांबून.
काल झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर बीडच्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावच्या अशोक आघाव यांच्या शेतात असलेल्या कुकुटपालनाच्या शेडवर मध्यरात्री वीज पडून तब्बल एक हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. परतीच्या पावसाने पिकाचं तर नुकसान होतंच आहे. मात्र, आता शेतीजोड व्यवसायावरही याचा परिणाम होत आहे. अशोक आघाव यांच्याकडील 1 हजार कोंबड्या क्षणार्धात मृत पावल्याने चार लाखांचे नुकसान झालं आहे.
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या 17, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द. वादळ आणि परतीच्या पावसाच्या शक्यतेने विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय. पुढील परीक्षा कधी होणार याबाबत अद्याप घोषणा नाही. बदल केलेल्या परीक्षांच्या घोषणा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती. 21 ऑक्टोबर नंतरच्या परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणे घेतल्या जाणार.
पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना गावातील साकव, पुल, रस्ते, मोऱ्या, गटारे यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने तीन लाख रुपये दिले जाणार. मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणचे साकव, पुल किंवा रस्ते कमकुवत आणि धोकादायक बनलेत. त्यामुळं कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी तीन लाख रुपये तातडीने दिले जाणार.
सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; एबीपी माझाच्या प्रयत्नांना यश. विद्यार्थ्यांनी अडचणी इमेल कराव्यात, सीईटी सेल आयुक्तांच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती.
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था खोळंम्बली आहे. नद्यांना पूर आले आहेत. त्यातच 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या CET परीक्षा सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे दुसऱ्या तालुक्यात असल्याने त्यांना केंद्रवर पोहोचणे शक्य नसल्याचे तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाहोचने शक्य नाहिये अशा विद्यार्थ्यांनी CET सेलच्या ईमेल वर सविस्तर माहिती आणि अडचण स्वरूप मेल करण्यास सांगिण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे आयुक्त CET हे जे निर्देश देतील त्याप्रमाणे कायवाही करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना प्रशासनला केल्याची माहिती देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात देखील NDRF च्या टीम ने रेस्क्यू केलं. तालुक्यातील रामपूर, तडवळ गावात जवळपास 60 गावकरी अडकुन पडले होते. या ग्रामस्थांना NDRF ने रेस्क्यू करत सुरक्षित स्थळी हलवलं. आतापर्यंत अक्कलकोट तालुक्यातील जवळपास 1234 कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतरित केले आहे. तालुक्यातील 33 गावांना पुराचा फटका बसला आहे. तर 1 हजार घरात पाणी शिरलं आहे. 328 घरांची पडझड देखील झाली आहे. 32 वाहतुकीच्या मार्गावर देखील परिणाम झाला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी ,आंदेवाडी व संगोगी (ब) परिसर बोरी नदीच्या पाण्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातला सीनाकोळेगाव प्रकल्प पूर्ण भरल्याने आज धरणांचे चार दरवाजे उघडण्यात आलेत. सीना नदीवर असलेल्या ह्या प्रकल्पाची क्षमता 4 टीएमसी आहे. परवा धरण 99 टक्के भरले होते.
सिंधुदुर्ग : रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सकाळी काहीशी उसंती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला जिल्हात सर्वत्र सुरुवात झाली आहे. परतीचा पाऊस अजून काही दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातशेती उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डोळ्यासमोर बहरलेलं पिवळं सोनं निसर्गाच्या लहरीपणामुळे मातीमोल होत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. एकीकडे शेतकरी परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडला असून दुसरीकडे मच्छीमारही संकटात आहे. अगोदरच वातावरणातील बदलामुळे मासेमारीसाठी गेल्यावर मासे मिळत नाही त्यात आता समुद्रात निर्माण झालेल्या वादळं सदृश्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे निर्देश मच्छीमारांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक बोटीसह परराज्यातील शेकडो बोटी देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत. कोकणातील सर्वात सुरक्षित बंदर असलेल्या देवगड बंदरात शेकडो बोटी आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे तळकोकणात बळीराजा आणी मच्छीमार दोन्ही आस्मानी संकटात सापडलेले आहेत.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पाटील हॉस्पिटलमध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळे जवळपास चार ते पाच फूट इतकं पाणी साचलं होतं, आता हॉस्पिटलमधील सगळे लोक मिळून पाणी आणि साचलेला गाळ बाहेर काढत आहेत
बीड (Beed) : गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील बहुतेक धरणं आता ओव्हर फ्लो झाली आहेत. अपवाद फक्त मांजरा धरणाचा आहे. मांजरा धरणामध्ये सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे. मात्र जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असलेल्या माजलगाव धरण त्यानंतर बिंदुसरा धरण ओसंडून वाहताना पाहायला मिळतंय. माजलगाव धरणाचे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा सगळे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. जायकवाडीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने जायकवाडी धरणाचे पुन्हा एकदा 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
बीड (Beed) : गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील बहुतेक धरणं आता ओव्हर फ्लो झाली आहेत. अपवाद फक्त मांजरा धरणाचा आहे. मांजरा धरणामध्ये सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे. मात्र जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असलेल्या माजलगाव धरण त्यानंतर बिंदुसरा धरण ओसंडून वाहताना पाहायला मिळतंय. माजलगाव धरणाचे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा सगळे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. जायकवाडीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने जायकवाडी धरणाचे पुन्हा एकदा 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
सातारा (Satara) : वीर, उरमोडी, कन्हेर, धोम, धरणाचेही दरवाजे उघडले आहेत. वीर धरणातून 4500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उरमोडी धरणातून 3500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणातून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांत परिस्थिती गंभीर होण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट आहेत.
सातारा (Satara) : काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊसाने म्हसवड परिसरात धुमाकुळ घातला आहे. मानगंगा नदीला महापूर आला असून म्हसवड गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.
विरकरवाडी, शिरताव, देवापूर, पळसावडे, बनगरवाडी,
पुळकोटी, वरकोटी मलवडी, जांबूळणी अशा 12 वाड्यांचा संपर्क तुटला आहे. दुष्काळी पट्यात मोडणाऱ्या या भागांत पावसाच्या हाहा काराने पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुणे : पुण्यात तूर्तास पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पुण्यातील पुणे - अहमदनगर रस्त्यांवर काल झालेल्या पावसामुळे अजुनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिलं आहे. मध्यरात्री नंतर पाऊस जरी थांबलेला असला तरी अनेक ओढ्या नाल्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरु आहे. त्यामुळं आनेक रस्ते आणि रहिवासी भाग अजुनही जलमय आहेत.
सांगली (Sangli) : सांगलीत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. सकाळी 6 वाजल्यापासून पावसाने उसंत घेतली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.
पुणे : पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. काल कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली.

सोलापूर : काल मध्यरात्री उजनी धरणातून तब्बल दोन लाख 50 हजार क्यूसेक्स ने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेले होते, मात्र पानलोटक्षेत्रातील पाऊस थांबल्याने सध्या हा विसर्ग दोन लाख करण्यात आलेला आहे.
पुणे : चासकमान धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातून आज रात्री 12 वाजता 500 क्युसेक्स विसर्ग विद्यूत विमोचकातून नदीला सोडला आहे, यापुढे पर्जन्य वाढल्यास नदीला विसर्ग वाढवावा लागणार आहे.
पुणे : पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या तीन तासापासून पावसाची संततधार सुरूच. मावळ तालुक्यात ही पाऊस बरसतोय. रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतोय. त्यामुळे पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
पुणे : चासकमान धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात रिमझीम पावसास सुरुवात झालेली असून यापूर्वीच धरण 100 टक्के भरले आहे. जर पावसाचे प्रमाण वाढले तर धरणातून केव्हाही पाण्याचा विसर्ग नदी पात्रात साेडावा लागेल. त्यामुळे भीमा नदी तीरावरील सर्व गावातील, शहरातील नागरीकांनी सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणा : जिल्ह्यात सकाळी 5 वाजेपासुन मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुलढाणा, खामगाव ,शेगाव ,मेहकर, संग्रामपूर तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक भागांत विज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने हातचा आलेला घास हिरावून घेतला आहे. मागील काही तासापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसळल्यामुळे, शेतात साचलेल्या पाण्यातील पिक बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या काही बघायला मिळते आहे. पाऊस पुन्हा येऊन उर्वरित पिकाचे नुकसान करतो का ...? यासाठी सध्या शेतकऱ्याचे आभाळाकडे डोळे लागले आहेत.
पालघर : जिल्ह्यातील पालघर, वाडा, विक्रमगड तालुक्यात संध्याकाळी झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी कापलेल्या आणि पिकून उभ्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, कापलेल भात पाण्यात बुडल तर उभं भात आडवं झालं आहे. अजूनही पावसाचं संकट कायम असून रिपरिप सुरूच आहे.
सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कृपया या भागातून जाण्याचे टाळावे ! महापौरांचे आवाहन
सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कृपया या भागातून जाण्याचे टाळावे ! महापौरांचे आवाहन
पुण्यातील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे.
पुण्यातील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे.
पुण्यातील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे.
पुणे सोलापूर हायवे पावसामुळे बंद केला आहे. उजनी धरणाचे पाणी भिगवण,डाळज,पळसदेव,इंदापुर येथे हायवेवर आले आहे. त्यामुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक लोणी काळभोर येथे थांबवली आहे. सोलापुर दिशेने प्रवास करू नये. उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.
रत्नागिरी : चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला, वादळी वाऱ्यासह गेले दोन तासांपासून पावसाची हजेरी, काही गावांतील वीज पुरवठा खंडीत
Live Update | पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागातील वीज गायब, बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले
सोलापूरात आज सकाळी 8.30 पासून दुपारी 2.30 पर्यंत 72 मिमी पावसाची नोंद

जिल्हयाभरात झालेल्या पावसाची नोंद, हवामान विभागाची माहिती
पालघर : समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वादळी वाऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे निर्देश तर समुद्रात मासेमारीस गेलेल्या मासेमारांनी किनाऱ्याचा आसरा घेण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत.
उजनी धरणातून 1 लाख क्यूसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात. वीर धरणातून 20 हजार तर पावसामुळे 30 ते 40 क्यूसेक विसर्गाने पाणी भीमा नदीच्या मिसळत असून एकूण विसर्ग दीड लाख क्यूसेक होणार आहे. नदीकाठच्या गावे व शहरांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
उजनी धरणातील विसर्ग 1 लाख 20 हजार क्यूसेक केला आहे. तर वीर धरणातून 23 हजार क्यूसेक विसर्ग, पंढरपूरवर पुराची टांगती तलवार
सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दिनांक 14 आणि 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टी पावसाने आणि खंडित वीजपुरवठा या कारणाने ऑनलाइन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत आहे. यामुळे या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे दिनांक 19 आणि 20 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यात येणार आहेत.
सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दिनांक 14 आणि 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टी पावसाने आणि खंडित वीजपुरवठा या कारणाने ऑनलाइन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत आहे. यामुळे या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे दिनांक 19 आणि 20 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यात येणार आहेत.
लातूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. काल दुपारपासून पावसाने पाठ सोडलेली नाही. याचा फटका जसा शेतीला बसला आहे तसा आता सर्वसामान्यांच्या जीवनावरही परिणाम दिसत आहे. हणमंतवाडीत दोन दिवसांपासून प्रेत अंत्यसंस्कार अभावी पडून आहे. हणमंतवाडी इथे रंगराव सुर्यवंशी या व्यक्तीचे काल निधन झाले. गावात ग्रामपंचयतीची स्मशानभूमी नाही, शेड नाही. यापूर्वी गावात कोणी मयत झाले तर शेतात अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र दोन दिवस झाले पाऊस पाठ सोडत नाही. शिवाय गावात स्मशानभूमी आणि शेड असला असतं तर दाहसंस्कार झाले असते. मात्र तशी आवश्यकता 300 घरे असलेल्या या गावाला कधी जाणवली नाही. आता त्याची आवश्यकता लक्षात आली आहे.गावात स्मशानभूमी, शेड नसल्याने प्रेतावर अंतिमसंस्कार करण्यासाठी आसरा नसल्यामुळे प्रेत दोन दिवसापासून घरातच ठेवण्याची वेळ आली आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी याबाबत पत्रव्यवहार केला होता, परंतु त्याचा परिणाम झाला नाही. आता पाऊस कधी कमी होतोय याची वाट गावकरी पाहत आहेत.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औराद, तगरखेडा, चांदाेरी, बाेरसुरी, सावरी, साेनखेड, शेळगी, हलगरा, हालसी, लिंबाळा, मदनसुरी, वांजरखेडा आदी गावात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.शेतमाल खराब झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद आहे. याशिवाय वीज पुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सोलापूर : हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत (दि. १७) अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.
सोलापूर : रात्री पासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अक्कलकोट तालुक्यात देखील रात्री 12 पासून तुफान पाऊस कोसळत आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव किरनळी ओढा दुथडी भरून वाहतोय. बोरगाव-बादोले, बोरगाव-घोळसगाव आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड पाणी साठलं आहे. हवामान विभागातर्फे सोलापूर जिल्ह्याला 17 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आपात्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासनाकडून फोन नंबर जारी करण्यात आला आहे.
हिंगोली : रात्री काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उस्मानाबाद : सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील सर्व मोठी धरणं 100 टक्के भरली असून पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणी झाली आहे. या पावसाचा रबी पिकांना मात्र फायदा होईल.
सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून आज पहाटेपासूनच संततधार सुरु आहे. गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण शहरात सलग पाऊस पडत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून, 15 आणि 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. गेला आठवडाभर राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या काळात राज्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुढिल चार दिवस महाराष्ट्रभरात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain LIVE Update | पुढील चार  दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.


आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून, 15 आणि 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. गेला आठवडाभर राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या काळात राज्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


पुण्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात


पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. तोपर्यंत  पुणेकरांना आजची संपूर्ण रात्र जागून काढावी लागण्याची शक्यता दिसत आहे.


पुण्यात मुसळधार पाऊस आणि अनेक भागातील वीज गायब झाली आहे. पाषाण, कर्वे नगर या भागातील वीज गायब आहे तर बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या माझे कुटुंब माझो जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे. तसेच पुणे -सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला आहे. उजनी धरणाचे पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर येथे हायवेवर आल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबवली आहे. कोणीही सोलापुर दिशेने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.


पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या तीन तासापासून पावसाची संततधार सुरूच. मावळ तालुक्यात ही पाऊस बरसतोय. रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतोय. त्यामुळं पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पावसामुळे ट्रॅफिक जॅम (Traffic on Pune Solapur Highway) झालं आहे. तर पुण्यातही सकाळी पावसाने उसंत घेतली तरी रात्रभर पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामुळे पुण्यातही अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक भागांत ट्रॅफिक जॅम (Pune traffic Update) झालं आहे. याशिवाय इंदापूर (Indapur), पंढरपूर (Pandharpur), सांगली (Sangali) या भागांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.