Maharashtra Rain Update : राज्यात आज (Rain News) हिंगोली, पालघर, बुलढाण्यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. तर पुढील काही तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 


Hingoli Rain Update: हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा भागात जोरदार पावसाची हजेरी  


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. आज हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ दिग्रस या गावांच्या शिवारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी झालेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गहूस हरभरा, ज्वारी, तूर यासह अन्य फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.


Palghar Rain news Updates: पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी


पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं शेतकरी धास्तावले असून  वीटभट्टी व्यावसायिक देखील चिंतेत आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


Pune Rain Updates: वातावरणातील बदल आणि पावसामुळे शेतकरी धास्तावला


पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर आणि तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तर रात्रीच्या दरम्यान काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी हंगाम धोक्यात आलाय. तरकारी, पिके, फळे आणि फुले यावर वातावरण बदलाचा परिणाम झाला असून पिकांवर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत आलाय. अचानक वातावरणातील बदल आणि पावसामुळे द्राक्षे, पेरु फळबागाधारक शेतकरी धास्तावला आहे. वारंवार औषध फवारणी करावी लागत असून त्यातच अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने  बळीराजाला मोठा फटका सहन करावा लागतोय.


Buldhana Rain News: बुलढाणा जिल्ह्यात आज सायंकाळी खामगाव, नांदुरा ,मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यामुळे खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील नदीला हिवाळ्यात पूर आला आहे. तर अनेक भागात पावसाने कांदा , हरभरा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. 


Akola Rain News: अकोला जिल्ह्यात देखील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. 



महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत; रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता