Maharashtra Cyber Police On Sextortion:  सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) नावाखाली मागण्यात येणाऱ्या खंडणीमुळे अनेकजण उद्धवस्त होत आहेत. या सेक्सटॉर्शनमुळे अनेकजणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.  सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात वाढ होऊ लागल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून (Maharashtra Cyber Police) पीडित व्यक्तींना आता मदतीचा हात देण्यात येणार आहे. त्यामुळे सेक्सटॉर्शन खंडणीचा फोन आल्यास घाबरून जाऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. सायबर पोलिसांकडून सेक्सटॉर्शन पीडितांचे समुपदेशन करण्यात येत आहे. 


सेक्सटॉर्शन म्हणजे काय? (What is Sextortion)


एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आल्यावर एक महिला नग्ना अवस्थेत काही वेळेसाठी स्क्रीनवर दिसते. हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो. हा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ कॉल व्हायरल करण्याची धमकी देऊन  पीडितांना धमकावून पैसे उकळले जातात. काहीजण इभ्रतीचा प्रश्न म्हणून खंडणीची रक्कम देतात. तर, काहीजणांकडून खंडणी मागणारा फोन क्रमांक ब्लॉक केला जातो. 


परिणाम काय?


सेक्सटॉर्शनची धमकी गांभीर्याने घेणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अशा व्यक्ती सातत्याने तणावाखाली असतात. सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळतात आणि एकलकोंडे होतात. यातून काहीजण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. 


महाराष्ट्रात सेक्सटॉर्शनची 229 प्रकरणे


या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात सेक्सटोर्शनची सुमारे 229 प्रकरणांची नोंद झाली आहे. सुमारे 2002 लेखी तक्रारी पोलिस ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. अशा फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी एकूण 172 जणांना अटक केले आहे. बहुतेक आरोपी हे परराज्यातील आहेत.


>> सेक्सटॉर्शनच्या खंडणीला बळी पडल्यास काय करावे? 


> घाबरू नका आणि फसवणूक करणार्‍याशी त्वरित संवाद थांबवा.


> ऑनलाइन असताना संभाव्य धोका समजून घ्या आणि सुरक्षित रहा.


> अनोळखी व्यक्तींसोबत कधीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.


>ब्लॅकमेल आणि धमक्यांचे पुरावे जतन करा.


> तुम्ही सेक्सटॉर्शनला बळी पडले असल्याची बाब जवळच्या पोलिस ठाण्यात कळवा.


> सेक्सटॉर्शन सारख्या प्रकरणाला धैर्याने सामोरे जा, घाबरू नका.


> कुटुंब आणि मित्रांना घटनेची माहिती द्या आणि त्यांना विश्वासात घ्या, जागरुक करा




 


इतर महत्त्वाच्या बातम्या: