Weather Update : राज्यातील  बहुतांश भागात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह (Mumbai) इतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तसेच त्याच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.


असे असताना गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने विदर्भ, मराठवाड्यालाही अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना बसला आहे. मुसळधार पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेले सोयाबीन (Soybeans) आणि कापसाचे (Cotton) पीक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यास चित्र आहे.


विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा कहर!         


हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने विदर्भ, मराठवाड्यातील शेतीचे आणि पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केलं आहे. औसा तालुक्यातील अनेक गावात शेत शिवारात पाणीच पाणी शिरल्याचे चित्र असून अनेक पिके पाण्यात बुडाली आहेत. दरम्यान, 30 तासानंतर शेतात जायला रस्ता मिळाला असल्याचेही बघायला मिळाले आहे. औसा तालुक्यात शनिवारी झालेल्या तुफान पावसामुळे अनेक शेती शिवारात पाणीच पाणी झाले आहे. औसा तालुक्यातील उजनी, एकंबी, मासूर्डी, टाका, तुंगी ,बिरवली, भादा ,जवगाव यासह अनेक गावातील सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेलंय. सुमारे दोन तासात तुफान झालेल्या पावसाने सर्व चित्र बदलून टाकले आहे. 


शेत शिवारात पोहोचणे ही मुश्किल 


दरम्यान, या भागातील नदी, नाले ओढे आणि शहरातील रस्तेही पाण्याने भरून वाहत होते. परिणामी अनेक भगत पावसाचे पाणी शेतात शिरले आहे. तर अनेक गावाच्या शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारी पाऊस झालेला असताना शेतात काल(रविवारी) संध्याकाळी पोहोचण्याला रस्ता मिळाला आहे. एकंदरीत सर्वत्र पाणीच पाणी असल्याने शेत शिवारात पोहोचणे ही मुश्किल झालं होतं.


काढणीला आलेला सोयाबीनला फुटताय कोंब 


दरम्यान काढणीला आलेला सोयाबीन काढून ठेवला असताना हा सोयाबीन पावसात भिजून गेला आहे. गेल्या दोन दिवस सातत्याने पाण्यात राहिल्याने सोयाबीनला आता कोंब फुटताय. उजनी परिसरातील शेतकऱ्यांचीही अशीच काहीसे परिस्थिति आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने वेळीच पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


शेताला आले तळ्याचे स्वरूप 


दुसरीकडे विदर्भातील वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून बरसात असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. परिणामी, खरीप हंगामातील काढणीला आलेले सोयाबीन पीक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यास चित्र आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी केलेलं सोयाबीन आता काढणीला सुरुवात झालेली आहे. मात्र, परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला असून  शेतात सोंगणी (कापणी)केलेलं आणि काढणीला आलेले सोयाबीन पिकाचे चिखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखी वाढ झाली आहे.


हे ही वाचा