Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं (Rain Update) अक्षरश: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आज देखील विदर्भात मुसळधार पावसानं (Vidarbha Weather Update) एकच दाणादाण उडवली आहे. रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


अशातच एका शेतकर्‍यांच्या शेतीची दाहकता मांडणार व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान वायरल होत आहे. हा चिमुकला शेतकरी पुत्र अकोल्यातली (AKola) बाळापूर तालुक्याच्या सावरपाटी गावचा रहिवासी असून सोहम विरोकार असे त्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्या देखत दोन एकर शेतात कशा पद्धतीने संकट ओढावलं, याचे भीषण वास्तव त्याने आपल्या शब्दात मांडले आहे.


आमचं सारं वावर गेलं पाण्यात,काही समजाले मार्ग नाही बाप्पा


या व्हिडिओ मध्ये हा  चिमुकला शेतकरी पुत्र म्हणाला की,  कालपासून पाणी पडून राहिलं. त्यात आमचं सारं दोन एकर शेत वाहून गेलं. हे काय करताती, आता इथं काय डोक्स पेरावं? हे पाहा डोक्स पेरासाठी चिखल, आता कुणाचं डोक्स पेरावं आम्ही? असा सवाल त्याने विचारला आहे. पुढे तो म्हणाला की, गेलं सारं आमचं वावर पाण्यात. दोन एक्करात एक कणही (बियांचा) राहिला नाही, सारं गेलं पाण्यात वाहून. काही समजाले आम्हाले मार्ग नाही बाप्पा. अशा शब्दात सोहम विरोकार या शेतकरी पुत्राने आपला आक्रोश मांडला आहे.


विदर्भात मुसळधार पावसाची दाणादाण


एकट्या अकोल्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत केलंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दुर्गाचौक ते जठारपेठ रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. या रस्त्यावरून वाहनं चालवतांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीये. महापालिकेनं केलेलं नालेसफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने धुवून काढलाय. या पावसामुळे सर्वत्र एकच  दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे.


तर दुसरीकडे काही दिवसापूर्वीच आकोट-अकोला महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेला पुल खचला होता. आता पुन्हा या मार्गावरील चोहोट्टा बाजार आणि करोडी फाटा नदीच्या पुलावरील आधार भिंती अक्षरशः पहिल्या पावसात कोसळली आहे. या पुलाला बांधकामाला काही महिनेच उलटले आहे. नुकत्याच कालच्या आणि आजच्या पावसामुळे अकोट अकोला मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाची आवार भिंत कोसळली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या