Ujani Dam :  राज्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून सोलापूर (Solapur)  जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरण सध्या वजा पातळीत आहे, मात्र लवकरच ते अधिक पातळीत जाणार आहे. 

Continues below advertisement


उजनी धरण झपाट्याने वजा पातळीतून अधिक पातळीकडे जाऊ लागले आहे. धरणात सध्या 18000 क्युसिक वीसर्गाने पाणी जमा होत असून आजची टक्केवारी वजा 7.72 एवढी आहे. त्यामुळं जर असाच पाऊस सुरु राहिला तर पुढच्या दोन दिवसात धरण अधिक पातळीत येण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पुण्यात पाऊस झाला की, उजनी धरण क्षेत्राला फायदा होतो, कारण धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी हे पुणे जिल्ह्यातून येते. त्यामळं पुणे जिल्ह्यात पडणारा पाऊस हा उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगला समजला जातो. 


उजनी धरणावर मोठ्या प्रमाणावर बागायती शेती अवलंबून


उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या धरणाची पाणी क्षमता ही 117 टीएमसी आहे. मागील वर्षी देखील चांगला पाऊस झाला होता. त्यामुळं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. या धरण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर बागायती शेती अवलंबून आहे. विशेषत ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर केळी, डाळिंब, द्राक्षांच्या बागांचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं उजनी धरणात होणारी पाण्याची वाढ ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरत आहे. 


राज्यातील विविध भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे . सोमवार सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे .अरबी समुद्र खवळला असून सकाळी समुद्राला भरती आल्याने मोठमोठ्या लाटा उसळत आहेत . मान्सून न महाराष्ट्रातील काही भाग व्यापला असून मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे .पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे .


महत्वाच्या बातम्या:


Ujani Dam Solapur: उजनी धरणच ICU मध्ये, पाणी विषारी, धरणाकाठचे रहिवासी भयंकर आजाराने ग्रस्त, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा भिगवणमध्ये जाऊन दावा!