Manikrao Kokate पंढरपूर: राज्यात सुरू असलेल्या पावसाला आता अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही. कारण मान्सूनही आता राज्यात दाखल झालेला आहे. दरम्यान राज्यात सरासरी 120 मिलिमीटर पाऊस झाला असल्याने सर्वच ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे  (Agriculture Minister Manikrao Kokate)  यांनी दिली. ते आज(26 मे) विठ्ठल दर्शनाला आले असता ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान यावेळी त्यांनी बोलताना अनेक अनेक मुद्यांवर भाष्य केलंय.  

मला शेतकऱ्यांनाही कोट घालून फिरलेलं बघायचंय- माणिकराव कोकाटे

दरम्यान, छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय पंतप्रधान देखील होतील, असा उपहासात्मक टोला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी  लगावलाय. नाशिकच्या पालकमंत्र्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून कोणीही यासाठी मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्या कोट घालण्यावर रोहित पवार यांनी केलेल्या शेरेबाजीला उत्तर देताना ते म्हणाले की,  मी आज नाहीतर पहिल्यापासून कोट घालतो. मला एक दिवस शेतकऱ्यांनाही कोट घालून फिरलेले बघायचे आहे. जर रोहित पवार यांच्याकडे कोट नसेल तर त्या सर्वांना आम्ही कोटही देऊ, असा टोला माणिकराव कोकाटे यांनी लगावला

राज्यभरात पावसाचा कहर! पावसामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले 

छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉन्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाली असून, बाजारात आवक कमी झाल्याने शिमला, कारले, फुलकोबी, कोबी, मेथी, टोमॅटोचे भाव वाढल्याचे पाहायला मिळाले, मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम भाजीपाला बाजार भावावर झाला आहे. आवक कमी झाल्याने फुलकोबीसह इतरही मालाचे भाव वाढल्याचे चित्र आहे. पावसामुळे जूनपर्यंत भाजीपाल्याच्या भावावर याचा आणखी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सध्या काही भाज्या स्वस्त आहेत, तर काहींचे भाव वाढले आहेत. आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली. पावसामुळे जूनपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बाजार भाव प्रतिकिलो रुपयांत

•लसूण 120 ते 200•शिमला 80 ते 100 •मेथी 20 •चुका 10 ते 15 •पालक 10 ते 15 •गाजर 30 •टोमॅटो- 50 •हिरवी मिरची  50 ते 60 •दुधी भोपळा 20 •अद्रक 40 •लिंबू 40•भेंडी 40  ते 50•कारले 60•कांदे 20•कांदे 20 ते 25 •गवार 50 ते 60•चवळी 40  ते 50•वांगी 20

हे ही वाचा