Yavatmal Crime News : नोकरीचे आमिष दाखवून अभियंत्याची फसवणूक (Fraud) केल्या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या एका अभियंत्याला नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 18 लाखाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी एलसीबी पथकाने  चौघांना अटक केलीय. अरविंद मोहाडीकर, राहुल रंगारीया, मल्लीकार्जूल पाटील, अनुराग चव्हाण असे फसवणूक करणारे संशयित आरोपींची नावे आहे. सध्या पोलीस (Crime News) या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.


चौघांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त 


यवतमाळच्या  राळेगाव शहरातील माता नगर येथील पराग मानकर  हा बीई सिव्हिल झालेला तरुण नोकरीच्या शोधात होता. दरम्यान,  त्याने 2023 मध्ये सहायक अभियंतापदाची परीक्षा दिली होती. पास झाल्यावर त्याचे नाव प्रतीक्षा यादीत होते. दरम्यान ओळख झालेल्या एका व्यक्तीने विश्वासात घेऊन नोकरीसाठी 18 लाख रुपये उकळले. नोकरीची बनावट ऑर्डर देऊन राळेगाव येथील पराग मानकर या तरुणाची फसवणूक केली. कालांतराने आपली फसवणूक झल्याचे माहित पडताच राळेगाव पोलीस ठाण्यात या तरुणाने तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. दरम्यान, तपासाचे धागे पुढे सरकल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली असून, 4 लाख रोकडसह एकूण 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.


बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोघांना बीडमधून अटक


2023 च्या पोलीस भरती प्रक्रियेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराने बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केले होते. कागदपत्र पडताळणीत बनावट प्रमाणपत्र बाहेर येताच त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवतमाळ शहर पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या दोघांना बीडमधून अटक केली आहे. महादेव दत्तात्रय वानरे, श्रीराम भैरवनाथ शेजाळ (बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.


पोलीस प्रसनांकडून 9 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा घेतल्यानंतर गुणवत्ता आणि  आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली. यादीनुसार अंबादास दिनकर सोनवणे ( रा. खांबा लिंबा, जि. बीड) याची निवड झाली होती. त्याच्या मूळ कागदपत्रांसह पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले होते. अजूनही इतर उमेदवारांना बनावट प्रमाणपत्र दिले काय याचा तपास पोलीस करीत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI