Maharashtra Rain News : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहिले आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water) देखील वाढ झालीय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात आजचा हवामानाचा अंदाज.
'या' पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील पाच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पुण्यातील पावसाचा जोर ओसरला
पुणे शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे. पुण्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा (Water) प्रश्न आती मिटला आहे. पुणेकरांसाठी हा मोठा दिलासा आहे. पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri-chinchwad City) आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 7.97 टीएमसी (93.64 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Rain) इतर धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, भाटघर आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली असून या धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पेडगाव, डिंभे, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, कासारसाई, गुंजवणी, नीरा देवघर आणि वीर ही धरणे काठोकाठ भरली आहेत, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठी?
खडकवासला: 82.13 टक्के
पानशेत: 93.37 टक्के
वरसगाव: 92.59 टक्के
टेमघर: 100 टक्के
मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हर फ्लो
मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. मुसळधार पाऊस पडल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असून चारही धरणं (Dam) ओव्हर फ्लो झाली आहेत. सर्वात आगोदर तानसा धरण ओव्हर फ्लो झाले होते, त्या पाठोपाठ मोडकसागर धरण, भातसा धरणही ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. तसेच वैतरणा धरण देखील ओसांडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Rain : दोन दिवसांच्या दमदार हजेरीनंतर नाशकात पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला, कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या