Maharashtra News Live Updates : मोठी बातमी! मनोरमा खेडकरांच्या पोलीस कोठडीत वाढ, पोलिसांकडून आणखी तपास होणार

Maharashtra Breaking 20th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

प्रज्वल ढगे Last Updated: 20 Jul 2024 05:21 PM
कलावती नगरमधील 15 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले

नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमधील 15 नागरिकांना एसडीआरएफ च्या पथकाने सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. पिपळा गावाशेजारी असलेल्या नाल्याला  पूर आल्याने सकल भागाती काही घरांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात इंगळे व किंगरे कुटुंबियांसह एकूण 15 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यानंतर एसडीआरएफ च्या पथकाला याची माहिती देण्यात आली होती. या सर्वांना सुरक्षित काढून माजी सरपंच नरेश भोयर यांच्या सह्यन्द्री कॉन्वेंमध्ये उभारण्यात आलेल्या मदत केंद्रावर ठेवण्यात आले

मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ.

* मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ.
* मनोरमा खेडकर यांच्या सोबत धमकी देताना उपस्थित असलेले इतर फरार असल्यानं मनोरमा खेडकर यांच्याकडून माहिती घेण्यासाठी पोलीसांनी पोलिस कोठडी वाढवून मागीतली.
* पोलिस कोठडीत जेवण वेळेवर मिळत नसल्याची मनोरमा खेडकर यांची तक्रार. त्यानंतर न्यायाधीशांनी मनोरमा खेडकर यांना कोणत्या वेळेला जेवण दिले हे तपासण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरातील व्हीडिओचा आधार घेतला जाईल असं म्हटलंय

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील सावर्डे पूल पाण्याखाली, वाहतूक बंद

कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा वारणा  नदीवरील सावर्डे पूल पाण्याखाली


वारणा-चांदोली भागात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस


वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ


जिल्हा प्रशासनाकडून सावर्डे पुलावरील वाहतूक केली बंद

मोठी बातमी! नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये 15 नागरिक पुरात अडकले

नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये 15 नागरिक पुरात अडकले ...


त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथक घटनास्थळी दाखल

खडकवासला धरणाच्या कालव्यातून उद्यापासून पाणी सोडण्यात येणार

उद्या पासून खडकवासलाचा नवीन मुठा उजवा कालवा सुरू होत आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी कालवात कोणी उतरू नये. खरीप हंगाम सुरू करत आहे, असे आवाहन पुण्याच्या खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे. उद्यापासून खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार.

शरद पवार आणि अजित पवार आज डीपीडीसी बैठकीला समोरासमोर

- शरद पवार आणि अजित पवार आज डीपीडीसी बैठकीला समोरासमोर.


- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक


- या बैठकीला शरद पवार उपस्थित .


- यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती


- *आजच्या डीपीडीसी बैठकीनिमित्त पवार काका - पुतणे समोरासमोर 


- दोन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात डीपीडीसी बैठकीला सुरुवात.

Nagpur Rain Live Updates : नागपूरकरांसाठी पुढील 24 तास कठीण, मुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी

नागपूरकरांसाठी पुढील २४ तास कठीण 


येत्या 24 तासात नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता 


हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी “रेड अलर्ट” जारी केला आहे


नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट


बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय


सकाळी 5:30 पासून 12 वाजता पर्यंत नागपूर मध्ये 160 मिली मीटरच्या वर पावसाची नोंद 

ग्रँट रोड इमारत दुर्घटनेत 3 जण जखमी, एका वृद्ध महिलेचा मृत्यू

ग्रॅण्ड रोड इमारत दुर्घटनेत इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात  यश


या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून १  वृद्ध महिलेचा मृत्यू

अजय महाराज बारस्कर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

अजय महाराज बारस्कर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाणार 


 काही दिवसांपूर्वी अजय महाराज बारस्कर यांची गाडी जाळण्याचंप्रकरण समोर आलं होतं 


 बारस्कर यांनी आज पुन्हा जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत

Vasai Virar Rain Live Update : वसई विरारमध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार

वसई : वसई विरारमध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधून-मधून जोरदार सरी बरसत असल्यामुळे काही ठिकाणी सखल भागात दुपारनंतर रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आज पालघर जिल्ह्यात आज हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाने दमदार हजेरी लावली.  

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळसी तलाव भरला, 1869 साली बांधण्यात आला होता तलाव!

तुळसी तलाव भरुन वाहू लागला
 
१८७९ मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता तुळशी तलाव
 
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव

मोठी बातमी! पोलिसांनी सात लाखांच्या बनावट नोटा पकडल्या, चार जण ताब्यात

मुंबई : ७ लाख १० हजारच्या भारतीय बनावट नोटांसह ४ जणांना गुन्हे शाखेकडून अटक


मानखुर्दमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई


मानखुर्द महामार्गावर काही जण भारतीय बनावट नोटा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती


त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी एका कारमधून ७ लाख १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत


या आरोपींकडे १००, २००  आणि ५०० च्या बनावट नोटा आढळून आल्या आहे.


या प्रकरणी पोलिसांनी शहानवाज आयुब शिराळकर ५० वर्षे, राजेंद्र आत्माराम खेतले ४३ वर्षे, संदीप मनोहर निवाळकर ४० वर्षे, ऋषिकेश रखुनाथ निवाळकर २६ वर्षे. यांना अटक केली आहे


आरोपींनी या नोटा कठून आणल्या त्या कुठे वितरीत केल्या जाणार होत्या याचा पोलिस तपास करत आहेत


या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Mumbair Rain Live Updates : अरबी समुद्राला उधाण, उंच उंच लाटांमुळे दादर चौपाटीवर असलेला वेव्हिंग डेक बंद

मुंबईमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. त्यातच आज साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची मोठी भरती असल्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंच उंच लाटा येऊन धडकत आहेत. यामुळेच दादर चौपाटीवर असलेला विविंग डेक बंद ठेवण्यात आला आहे,

Mumbair Rain Live Updates : अरबी समुद्राला उधाण, उंच उंच लाटांमुळे दादर चौपाटीवर असलेला वेव्हिंग डेक बंद

मुंबईमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. त्यातच आज साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची मोठी भरती असल्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंच उंच लाटा येऊन धडकत आहेत. यामुळेच दादर चौपाटीवर असलेला विविंग डेक बंद ठेवण्यात आला आहे,

मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले ..


त्यामुळे प्रवाशांसाठी विमानतळावर जाण्याचा व बाहेर पडण्याच्या मार्ग पोलिसांनी पूर्णत: बंद केला


या मुसळधार पावसामुळे पालिका प्रशासनाच्या उपाययोजनेची पोलखोल झाली आहे

Nagpur Rain Live Update : नागपूरच्या पडोळे हॉस्पिटल चौकात रस्त्याला नदीचं रूप

नागपूरच्या पडोळे हॉस्पिटल चौकात रस्त्याला नदीचं रूप आलं आहे. मुसळधार पावसामुळे स्वावलंबी नगरकडे जाणारा रास्ता जणू नदीपात्र वाटत आहे. ड्रेनेज सिस्टीम कोलमडल्याने शहरात पुरसदृश स्थिती पाहायला मिळत आहे. 

Manoj Jarange Patil : आता सरकार लाडका मेहुणा, लाडकी मेहुणी योजना आणतील, मनोज जरांगेंची टीका

सरकारला मराठा, धनगरांना आरक्षण द्यायचं नाही. दलितांना न्याय दिला जात नाही. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग केला जात नाही. मुस्लिमांनाही आरक्षण दिलं जात नाहीये. अशा सर्वांनाच आरक्षण द्यायचे नाही. लाडकी बहीण, लाडकी भाऊ योजना आणल्या. आता लाडका मेहुणा आणि लाडकी मेहुणी या योजना आणतील, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

आम्ही सगेसोयरेच्या मागणीवर ठाम, मराठा कुणबी एकच; मनोज जरांगे यांनी दंड थोपटले!

आम्ही आरक्षणाबाबत ठाम आहोत. आम्ही सगेसोयरेच्या मागणीवर ठाम आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहोत. 2004 साली सुशिलकुमार शिंदे यांनी त्याबाबत कायदा बदलला होता, असे मनोज जरांगे म्हणाले.

सरकारने ईडब्ल्यूएस, एसईबीसी चालू ठेवावे, मनोज जरांगे यांची मागणी

आम्ही सरकारला वेळ दिला होता. मराठा समाजातील तरुणांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही. मराठा समाजातील तरुणांना अडचणी येत आहेत. सरकारने ईडब्ल्यूएस, sebc चालूच ठेवावे.

Nagpur Rain Live Updates : नागपूरच्या वाठोडा परिसरात सकाळपासून दमदार पाऊस, परिसरात साचले पाणी

नागपूरच्या वाठोडा परिसरात सकाळपासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरांच्या आवारात पाणी साचले आहे.

Pooja Khedkar : दिल्ली क्राईम ब्रांचकडून गुन्हा दाखल, पूजा खेडकर विमानाने दिल्लीला

दिल्ली क्राईम ब्रांचने गुन्हा दाखल केल्यानंतर आयएएस पूजा खेडकर यांचे दिल्लीच्या दिशेने उड्डाण 


परंतु दिल्ली क्राईम ब्रांचकडे पूजा खेडकरच्या दिल्लीवारीची कोणतीही माहिती नाही 


तसेच दिल्ली क्राइम ब्राँचने खेडकर यांना बोलावण्याविषयीच्या वृत्ताचा केला इनकार

Bhandara Rain Live Updates : भंडाऱ्यात अतिवृष्टी, जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी!

भंडारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी


हवामान विभागाने भंडाऱ्याला दिला रेड अलर्ट 


अतिवृष्टीमुळे भंडाऱ्यात जलमय स्थिती

पुण्यात भीषण अपघात, मागून येणाऱ्या कारनं उडवलं, पती-पत्नी फुटबॉलप्रमाणे हवेत उडाले!

पुणे : नगर कल्याण महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबेना


नगर कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार येथे कार दुचाकी अपघात 


पाठीमागुन येणा-या कारने दुचाकीला फुटबॉल प्रमाणे उडवलं 


पतीपत्नी दुचाकीवरून जात असताना पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या कारने उडवले


 यावेळी दुचाकी वरुन पती पत्नी हवेत उडाले 


यामध्ये दोघेही थोडक्यात बचावले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु


अंगावर काटा आणणार अपघाताचा थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झालाय

Mumbai Rain Live Updates : मालाड सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी, रस्ता वाहतुकीसाठी बंद

मालाड सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी


पाण्यामुळे मालाड सबवे बंद करण्यात आला आहे

Nagpur Rain Live Updates : नागपूरमध्ये मुसळधार पाऊल, सर्व शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर

नागपूर : सर्व शाळा कॉलेजसला सुट्टी जाहीर


नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी जाहीर केली सुट्टी

Mumbai Rains Live Updates : मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद करण्याचा निर्णय!

मुंबई : पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे


अंधेरी सबवे खाली


चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे

गोंदिया, भंडारा आणि नागपूरमध्ये पहाटेपासून दमदार पाऊस

गोंदिया, भंडारा आणि नागपूरमध्ये पहाटेपासून दमदार पाऊस होत आहे.

Mumbai Rain Live Updates : मुंबई लोकलसेवा विस्कळीत, हार्बर रेल्वे 15 मिनिटे तर मध्य, पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने

मुंबईसह परिसरात पडत असलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम 


मध्य व पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटं उशिराने 


तर हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत

Mumbai Rain Live updates : मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, कल्याण डोंबिवलीतील जनजीवन विस्कळीत

मुंबई, उपनगरांत जोरदार पावसाची हजेरी


मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने


कल्याण डोंबिवलीतील जनजीवन विस्कळीत


बदलापुरात मुसळधार पाऊस

Mumbai Rain Live updates : मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, कल्याण डोंबिवलीतील जनजीवन विस्कळीत

मुंबई, उपनगरांत जोरदार पावसाची हजेरी


मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने


कल्याण डोंबिवलीतील जनजीवन विस्कळीत


बदलापुरात मुसळधार पाऊस

धक्कादायक! गडहिंग्लजमध्ये पत्नीकडून हात पाय बांधून जवानावर विष प्रयोग

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये पत्नीकडून हात पाय बांधून जवानावर विष प्रयोग


घराचा दरवाजा तोडून शेजाऱ्यांनी केली जवानाची सुटका


अमर देसाई असं जवानाचं नाव, पत्नीला केली अटक


विषप्रयोग करणाऱ्या पत्नीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू


अत्यावस्थ जवानाला उपचारासाठी पुण्याला हलवले

धक्कादायक! गडहिंग्लजमध्ये पत्नीकडून हात पाय बांधून जवानावर विष प्रयोग

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये पत्नीकडून हात पाय बांधून जवानावर विष प्रयोग


घराचा दरवाजा तोडून शेजाऱ्यांनी केली जवानाची सुटका


अमर देसाई असं जवानाचं नाव, पत्नीला केली अटक


विषप्रयोग करणाऱ्या पत्नीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू


अत्यावस्थ जवानाला उपचारासाठी पुण्याला हलवले

धक्कादायक! गडहिंग्लजमध्ये पत्नीकडून हात पाय बांधून जवानावर विष प्रयोग

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये पत्नीकडून हात पाय बांधून जवानावर विष प्रयोग


घराचा दरवाजा तोडून शेजाऱ्यांनी केली जवानाची सुटका


अमर देसाई असं जवानाचं नाव, पत्नीला केली अटक


विषप्रयोग करणाऱ्या पत्नीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू


अत्यावस्थ जवानाला उपचारासाठी पुण्याला हलवले

Mumbai Rain Live Updates : मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सकाळपासून कोसळधारा!

मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात 


मुंबईत सर्वदूर कोसळधारा


उपनगरातही सकाळपासूनच पावसाचा जोर


 

मोठी बातमी! गडचिरोलीच्या सिरोंचा भागात ढगफुटी, 75 विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं

आज विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट तर नागपूर, गचिरोली, वर्धा व अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट


24 तासात गडचिरोलीच्या सिरोंचा भागात तब्बल 183 मिमी पाऊस कोसळला


 सिरोंचात ढगफुटी पाऊस झाल्याने नदी नाल्याला पूर आला होता . एका शाळेत अडकलेल्या 75 विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आले


गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्याच्या काही भागात पूर परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले असून सकल व नदीकाठावरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सल्ला दिला आहे.

Nagpur Rain Live Updates : नागपूरमध्ये सकाळपासून दमदार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर

नागपूर : नागपूरमध्ये सकाळपासून दमदार पावसाला सुरूवात 


जनजीवन विस्कळीत 


नागपूर जिल्ह्यासाठी नागपूर वेध शाळेकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर ...

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारने लागू केलेली लाडका बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आम्ही तरुणांसाठीदेखील लाडका भाऊ योजना आणली आहे, असा दावा केला जातोय. दुसरीकडे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागासाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे यासारख्या भागात पावसाने जोर धरला आहे. या प्रमुख तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.