Maharashtra Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत आहे. कुठं मुसळधार पाऊस पडतोय, तर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट  (Orange Alert) तर कुठं यलो अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट


हवामान विभागानं दिलेल्या, आज कोकणात पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


मुंबईसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी


दरम्यान, आज मुंबईसह पालघर आणि ठाण्यात देखील जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 


पेरणीच्या कामांना वेग


दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.


पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी


अनेक ठिकाणी चांगला पाऊस कोसळत आहे.  महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी केली आहे. वर्षा पर्यटनामुळे आंबोली बहरली आहे. निसर्गाने बहरलेली आंबोली आता गर्दिनेही बहरून गेली आहे. डोंगर दऱ्यात उतरणारे ढग, डोंगराच्या कडे कपारीतून कोसळणारे धबधबे, रिमझिम पाऊस, सर्वत्र पडलेली दाट धुक्याची चादर, अंगाला झोंबणारी थंडी, नजर फिरेल तिकडे प्रसन्न करणारी हिरवीगार वनराई यामुळे पर्यटक आंबोलीत मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Monsoon Updates: महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधारेचा अलर्ट, तर मुंबईत पावसाचा जोर वाढणार; IMD चा अंदाज काय?