Maharashtra Rain : हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार रविवारी राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. रविवारचे चित्र पाहता नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे  (Heavy Rain) अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झाली. तर, पावसामुळे अनेक प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहू लागले. पावसाची आतापर्यंतची एकूण परिस्थिती पाहता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून ते आतापर्यंत राज्यात 125 टक्के पावसाची नोंद झालीय. राज्यात सरासरी 822.2 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात 1 हजार 40 मिमी पाऊस आतापर्यंत झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या भागात झाला? कोणत्या जिल्ह्यावर पाऊस रुसला? जाणून घेऊया महाराष्ट्रातील पावसाचे ताजे अपडेट (Maharashtra Rain Update)



राज्यात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस झाला? कोणत्या जिल्ह्यावर पाऊस रुसला?



 



  • मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 147 टक्के अधिक पाऊस, यंदा 1 जूनपासून 874 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी 594 मिमी पाऊस होत असतो. 


 



  • मराठवाड्यात देखील सरासरीच्या 114 टक्के पावसाची नोंद झालीय, तर सरासरी 488 मिमी पाऊस होत असतो, मात्र प्रत्यक्षात 559 मिमी पावसाची नोंद झालीय.


 



  • तर अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. अहमदनगरमध्ये सरासरीच्या 174 टक्के पाऊस झाला, तर सरासरी 313 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र, अहमदनगरमध्ये 544 मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झालीय.


 



  • सांगलीत देखील सरासरीच्या 173 टक्के अधिक पाऊस झाला आहे. सांगलीत आतापर्यंत 615 मिमी पाऊस कोसळला आहे, सरासरी 356 मिमी पावसाची नोंद होत असते.


 



  • सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची नोंद झाली आहे. हिंगोलीत सरासरी 627 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत सरासरीच्या 52 टक्के पावसाची नोंद झाली आहे  आतापर्यंत हिंगोलीत 328 मिमी पावसाची नोंद झालीय.


 



  • तर विदर्भात सरासरी 790 मिमी पाऊस तीन महिन्यात होत असतो मात्र प्रत्यक्षात 917 मिमी पाऊस बरसला.


 



  • गोंदियात सरासरी 1040 मिमी पाऊस होत असतो, मात्र प्रत्यक्षात 953 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या 8 टक्के तूट दिसते आहे. 


 



  • अमरावतीत देखील सरासरी 686 मिमी पाऊस होत असतो, मात्र आतापर्यंत प्रत्यक्षात 4 टक्क्यांनी तूट असून 661 मिमी पावसाची नोंद झाली आहे


 


हिंगोलीतही पावसाची चांगलीच दाणादाण


रविवारी हिंगोलीतही पावसाने चांगलीच दणादाण उडवली, मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओढे ओसंडून वाहत होते. एकीकडे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली, तर दुसरीकडे या पावसामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूलबसही पाण्याखाली गेल्या, तर विविध भागात नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्याने रस्ते दिसेनासे झाले होते. यामुळे प्रशासनाकडून बचाव कार्यही सुरू करण्यात आले होते. रविवारचे चित्र पाहता या भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, तर नुकसान पाहणीसाठी प्रशासनाकडून आढावा घेतला जातोय.


 


आणखी वाचा


Marathwada Rain: धो-धो पावसाने जायकवाडी धरण भरलं, बीडमध्ये तुफान पाऊस, जालन्यात अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला