Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह परिसरात पावसाची रिपरिप, येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार
रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात पाऊस सुरु झाला आहे. मुंबईसह परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरवात झाली आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, कणकवली तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी म्हणावा तसा पाऊस पडला नाही. जून महिन्यातील पंधरा दिवस उलटून गेले तरी पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करण्यासाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. हवामान विभागाच्या माहिती नुसार येत्या पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. ममदापुर येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत उडाले आहे. संगणकासह नवीन पाठ्यपुस्तके भिजली असून, शाळेचे टिनपत्रे तुटले आहेत. शाळा सुरू होण्यास काहीच दिवस उरले असताना शाळेचं मोठं नुकसान झालं आहे. शाळेतील संगणक, रेकॉर्ड, शालेय पोषण आहार सुद्धा पाण्यात भिजला असून नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
Rain News : आज सायंकाळपर्यंत नागपूरसह विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागानं वर्चातवली आहे.
येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Washim Rain : वाशिम जिल्ह्यात आजपासून अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. पाऊस बरसत असल्यानं खरीप पेरणीला वेग येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली त्यांच्या पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात पाऊस सुरु झाला आहे. आज सकाळपासूनही पावसाची रिमझीम सुरु आहे. मुंबई आणि परिसरात जरी पाऊस पडत असला तरी अन्य ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. राज्यात मान्सून दाखल झाला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही.
हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कृषी विभागाचं आवाहन
राज्याच्या काही भागात पावसानं चांगली हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. त्याठिकाणचे शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
दरम्यान, सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून म्हणजेचं आजपासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं आजपासून पुढच्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -