Pune- Mumbai Expressway Accident: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव कारनं मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (9 एप्रिल) दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनकडून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. संबंधिक कार मुंबईच्या दिशेने जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास स्कोडा कंपनीच्या कारनं गहूंजेच्या क्रिकेट स्टेडियम समोरच उभा असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अपघातग्रस्त कार सुसाट वेगात असल्याचा अंदाज यंत्रणांनी वर्तविला आहे. कारचालकानं पन्नास मीटर पासूनच ब्रेक लावल्याचं चाकाचे व्रण मार्गावर स्पष्ट दिसतायेत. या अपघात इतका भीषण होता की, यात कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात मरण पावलेल्या लोकांची ओळख पटविण्याचं पोलीस प्रयत्न करीत आहेत. 


वर्धा: आर्वी पाचोड मार्गावर वऱ्हाड्यांच्या वाहनाला अपघात
आर्वी तालुक्यातील पाचोड ते आर्वी रस्त्यावर  लग्नसमारंभा करीता वरात टेम्पोने आर्वीकडे येत असतांना अचानक नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. त्यावेळी येणाऱ्या जाणाऱ्यांनी तात्काळ मदत करत अपघातग्रस्तांना उपजिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केले. ही बाब आमदार दादाराव केचे यांना कळता त्यांनी थेट उपजिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णांची एकंदरीत वैद्यकीय स्थितीबाबत डॉक्टरांकडून जाणून घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्याबाबत दक्षता पाळणे गरजेचे असल्याने अपघातग्रस्तांना तातडीने वर्धा येथे उपचारासाठी पाठविण्या करीता दादाराव केचे यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.


आर्वी येथील सहकार मंगलकार्यालयात, वर प्रफुल गोपाळराव जाधव यांचे वधू अश्विनी भालचंद्र पवार यांचे लग्न आयोजित केले होते. लग्नसमारंभात उपस्थित होण्यासाठी काही वऱ्हाडी टेम्पोने पाचोड कडून आर्वीला येत असतांना हा अपघात झाला. अठराही रूग्ण अस्वस्थ असल्याने वर्धा येथे पाठविण्यात आले.


हे देखील वाचा-