Nanded News Update : नांदेडमधील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील मांजरा नदी पात्रात काल एका पुरूषाचा (वय 35) संशयास्पद मृतदेह आढळला आहे. रेती उत्खनन केलेल्या नदी पात्राच्या पाण्यात हा मृतदेह आढळून आला आहे. 


बिलोली पोलिसांना याबाबत माहिती मिळ्यानंतर पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी रेती घाटात आढळून आलेल्या मृतदेहाचा पंचनामा केला. आरोग्य विभागामार्फत त्याच ठिकाणी  शवविच्छेदन केले. त्यानंतर सगरोळी ग्रामपंचायतीच्या मदतीने या मृतदेहाचा कुठलीही ओळख न पटवताच स्मशानभूमीत दोन ते तीन तासात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे या घटने विषयी पोलिसांच्या सारवासारव करण्यावर नांदेड जिल्ह्यातून तर्कवितर्क काढले जात आहेत.


बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे सुरू झालेला रेती धक्का हा ठेकेदार आयुब मचकुरी यांचा असून, हा रेती घाट सुरू झाल्यापासून नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. तसेच पत्रकारांवर व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांवर गावकऱ्यांच्या मदतीने केलेला हल्ल्याच्या अनेक घटना ताज्या असताना आज पुन्हा त्याच ठेकेदाराच्या घाटात अनोळखी मृतदेह सापडल्याने आणि त्या मृतदेहाचा अंत्यविधी पोलिसांनी घाईगडबडीत केल्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आत आहे. याबरोबरच घटनेचा योग्य तपास केला जावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या