Maharashtra BJP : शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेला शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. बहुमत चाचणी जिंकल्यानंतर आता नवनिर्वाचित सरकार लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे. अशातच महत्त्वाच्या भाजप नेत्यांसोबतच बंडखोर आमदारांचीही मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक बदलाच्या हालचालींनी वेग धरल्याचं पाहायला मिळत आहे. 


नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजप संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. अशातच, भाजप प्रदेशाध्यक्षाची धुरा नव्या नेत्याच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नावाची चर्चा आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा कार्यकाळ पुढल्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवा चेहरा दिला जाऊ शकतो. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना मंत्रीपद मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. विशेष म्हणजे, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह 21 जून रोजी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shivsena : शिवसेनेच्या आमदारांनंतर आता 'हे' खासदारही देणार उद्धव ठाकरेंना धक्का?