एक्स्प्लोर

Maharashtra Politics | अजित पवारांसोबत गेलेले तीन आमदार परतले!

अनिल पाटील आणि दौलत दरोडा दिल्लीहून मुंबईत परतले आहेत. आता राष्ट्रवादीचे केवळ दोन आमदारच संपर्कात नाहीत. एक म्हणजे खुद्द अजित पवार आणि दुसरे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे.

मुंबई : एकीकडे 27 आमदार अजित पवार यांच्या पाठिशी असल्याचा दावा भाजपने केला असतानाच, त्यांच्यासोबत गेलेले तीन आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. अनिल पाटील आणि दौलत दरोडा दिल्लीहून मुंबईत परतले आहेत. तर नरहरी झिरवळही दिल्लीहून निघाले आहेत. त्यांचा मुक्काम देखील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्येच असेल. आता राष्ट्रवादीचे केवळ दोन आमदारच संपर्कात नाहीत. एक म्हणजे खुद्द अजित पवार आणि दुसरे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना हे आमदार त्यांच्यासोबत राजभवनात उपस्थित होते. शपथविधीनंतर हे तिन्ही आमदार दिल्लीला गेले होते. "आम्हाला वाटलं की पवार साहेबांचा पाठिंबा असेल म्हणून आम्ही गेलो होतो. दादा आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांचा आदेश आम्ही पाळला. पण आता आम्ही परत आलो आहोत. आम्ही पवारांसोबत आहोत. कुठेही काही गैरसमज नाही," अशी प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम हलवला दुसरीकडे राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारांचा मुक्काम रेनेसॉन्स हॉटेलमधून ग्रॅण्ड हयातमध्ये हलवण्यात आला आहे. रातोरात सर्व आमदारांना हॉटेल हयातला नेण्यात आलं. रेनेसॉन्स हॉटेलमध्ये साध्या वेशातील पोलिस कार्यकर्त्यांना दिसले. त्यामुळे खबरदारी म्हणून सगळ्या आमदारांना ग्रॅण्ड हयातमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान रात्री उशिरा छगन भुजबळ, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे आमदारांना भेटायला गेले होते. शरद पवार साताऱ्याला रवाना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळी सहाच्या सुमारास सिल्वर ओक या निवासस्थानावरुन साताऱ्यातील कराडला रवाना झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित होणाऱ्या कार्यक्रमात पवार सहभागी होणार आहेत. सकाळी साडेआठच्या सुमारास ते यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगम इथे जाऊन त्यांना आदरांजली वाहतील. यानंतर पवारांच्या हस्ते राम खांडेकरांच्या पुस्तकाचंही प्रकाशन होणार आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची चौकट मोडून भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कराड दौऱ्यात शरद पवार काय बोलणार का याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या सत्तापेचावर आज सुनावणी महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात रविवारी झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज (25 नोव्हेंबर) सकाळी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पॉलिटिकल नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने महाधिवक्ते तुषार मेहता यांना सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं आज सकाळी 10.30 वाजता कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने महाधिवक्त्यांना राज्यपालांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केलेलं पत्र आणि फडणवीस यांनी त्यांच्याकडील बहुमताचा दावा करणारे पत्र आजच्या सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तातडीने विधीमंडळात बहुमत सादर करण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने मान्य केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget