Sanjay Raut : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या (Vidhan Sabha) निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचं ठरल्याचे मत शिवसेना खासदार (ठाकरे गट)  संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. काल (9 मार्च) रात्री महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. ते दिल्लीत आज (10 मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितलं. रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते अशी माहितीही राऊतांनी दिली. या बैठकीत आणखी काही भूमिका ठरल्याचे राऊत म्हणाले.


अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्यांना तत्काळ मदत करावी


सध्या राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. ही महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. पण आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवा, अशा प्रकारचे जात दाखवण्याचे काम राज्य करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. मात्र, आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला त्यांचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल असे राऊत म्हणाले. शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व याबाबत कधीही समझोता करणार नाही असेही राऊत म्हणाले. अवकाळी पावसामुळं नकुसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी असी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यासाठी शिवसेना आंदोलन करत असल्याचे राऊत म्हणाले. सामान्य माणसाला न्याय मिळावा या हेतून शिवसेना काम करत असल्याचं राऊतांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण', पक्ष फुटीवरुन राऊतांचा भाजपवर 'प्रहार'