मुंबई : 'डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया? "हाता"ला धरलंया म्हणिते गणित ठरलंया...' अशी कविता ट्वीटर शेअर करत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील काव्यात्मक टीकेनेच उत्तर दिले आहे. "भस्म्या झाला भाजपला भस्म्या झाला या, खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या" असे म्हणत दानवे यांनी शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे. 


आशिष शेलार यांची कविता! 


यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया! 
डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया? 
"हाता"ला धरलंया म्हणिते गणित ठरलंया 


यांना भरलंया न्यारं पिसं, 
हे पाही ना रातंदिस 
सोळा करुन गोळा बसं 
कोण तुतारी घेऊन येतं कोण मशाल पेटवून असं 
मोदी-मोदी करीत बसलंया.. 
"घमेंडिया" मध्ये फसलंया.. 


हाता"ला धरलंया म्हणिते आमचं गणित ठरलंया?


मन नाही यांच स्थिर, 
यांना राहिला ना धीर 
जागांची किरकिर 
हरण्याची घाई फार 


मोदींच्या भीतीनं घेरलंया यांना भीतीनं घेरलयां... हाताला धरलंया म्हणिते गणित ठरलंया! 
डोकं फिरलंया, आघाडीचं डोकं फिरलंया? 






शेलारांना दानवेंच काव्यात्मक टीकेनेच प्रत्युत्तर...


यांना भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला या! 


भस्म्या झाला भाजपला भस्म्या झाला या, 
खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या.. 


हे पाही ना रात्रंदिस, 
मोदी-मोदी पूजत बसं.. 
सारे भ्रष्टाचारी घेऊन कसं.. 
वॉशिंग मशीनमधून काढी असं.. 
खोटी गॅरेंटी देत बसलया.. 


खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या.. 


मणिपूर म्हणती आमचेच घरं.. 
तिथे जायला हिंमत नाही बरं.. 
महाराष्ट्रात विरोधात वारं फिरं.. 
हे हिमालयात जाणार बरं.. 


जनता उत्तर मागते या.. 
प्रचारक हकालती या.. 


ईडीचं बाहुलं केलं या.. म्हणी भाजपमध्ये या.. 






इतर महत्वाच्या बातम्या :


गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने 550 कोटी निधी घेतला, संजय राऊतांचा गंभीर आरोप