छत्रपती संभाजीनगर : गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपने (BJP) साडेपाचशे कोटी निधी घेतला, असा गंभीर आरोप शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याचं उत्तर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) द्यावं, असंही राऊत म्हणालेत. भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, यांच्या चेहऱ्याला मुले घाबरतात, गब्बर नंतर लोक यांनाच घाबरतात. मोदी चेहरा की, मुखवटा हा देश ठरवतील, असं वक्तव्य करत राऊतांनी मोदींवर जहरी टीका केली आहे.


कोण चिकन, मटण हा प्रचाराचा मुद्दा आहे का?


कोण चिकन खातं, कोण खात नाही, हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपने साडेपाचशे कोटी निधी घेतला, याचं उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यावं. भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं आहे, असंह राऊतांनी म्हटलं आहे. मोदी चेहरा की, मुखवटा हा देश ठरवतील. लोक भूत आलं म्हणतात आणि मुलंही घाबरतात चेहऱ्याला, असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 


पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल


मोदींचे नाणे घासून पुसून गुगुळीत झाले आहे. मोदी आता बाजारात चालत नाही. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबु पैसा आहे. श्रावणात मटण हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? प्रचाराचा स्थर एवढा खाली आणत असतील, तर त्यांना पराभवाची भीती आहे. गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपने निधी घेतला. भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा मटण खाल्लेलं चांगलं, असं म्हणता राऊतांनी जोरदार प्रहार केला आहे. 


पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक सामान्य नाही


लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात उमेदवार मिळत नाही. ही जागा लढवण्यावरून वाद आहे. लाखो मुस्लिम शिवसनेच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. अनेक दलित आणि मुस्लिम संस्था या संविधान रक्षणसाठी एकत्र येत आहेत. शिवसेनेचे चार ही उमेदवार विजयी होत आहेत, जालना आणि लातूरमध्ये बदल होणार आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक सामान्य नाही. आदर्श टॉवर माहविकास आघाडीच्या धडकेने ढासळेल, असंही राऊत म्हणाले आहेत. 


प्रकाश आंबेडकरांचे विचार आणि भूमिका वेगळी


आम्ही भाजपचा दारून पराभव करणार म्हणून त्या जागा फिक्स. राजकारण आम्हाला ही कळते. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावे म्हणून अतोनात प्रयत्न केला, प्रेमाने हात जोडले. आम्ही त्यांना सहा जागा दिल्या. खोटं वाटत असेल तर नाना पटोले होते, पृथ्वराज चव्हाण यांनी एकत्र येण्याची विनंती केली होती. आम्ही त्यांच्या विषयी कायम आदर ठेवू. देश संकटात असताना जे एकत्र राहत नाही त्याची देश नोंद ठेवतात. प्रकाश आंबेडकर यांचे अनेकांशी वाद सुरू आहे. त्यांची भूमिका आणि निकाल वेगळा होता. त्यांच्या साठी सदैव आमचे दरवाजे उघडे आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे.