Maharashtra Politics : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) सभापतीपदासाठी भाजपकडून (BJP) हालचाली सुरु झाल्या आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सभापतीनिवडीपूर्वी राज्यपाल कोट्यातील 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी भाजपचे प्रयत्न आहेत. ठाकरे सरकारनं 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी शिफारस केलेली यादी राज्यपालांनी अखेरपर्यंत मान्य केली नाही. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ही यादी रद्द केली. आता सभापती निवडणुकीआधी नवी यादी पाठवून आमदारांची नियुक्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या यादीत भाजप आणि शिंदे गटाकडून कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता आहे.
विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदेंचं नाव आघाडीवर
महाराष्ट्रात शिंदे गटासोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपनं सत्ता स्थापन केली. मंत्रिमंडळ विस्तारही झाला. आता भाजपचं लक्ष्य विधान परिषदेकडे आहे. विधान परिषदेच्या सभापतीपद मिळवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजप आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे. सध्या विधानपरिषदेत भाजपचे 25, तर शिवसेनेकडे 11 आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 10 जागा आहेत. तसेच 16 जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होतं आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल.
शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप
काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपात भाजपचं वरचस्व दिसून आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे असलेल्या खात्यांपेक्षा अधिक महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपकडे गेलेली खाती पाहता राज्यात खरी सत्ता ही भाजपचीच असणार हे आता उघड झालं आहे. निधी वाटपातले प्रमाण पाहता भाजपकडे 80 टक्के आणि शिंदे गटाकडे 20 टक्के सत्ता असंच विभाजन झालेलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :