Sanjay Raut : शिवसेना (Shivsena) फोडून भाजपनं (BJP) मोठा गुन्हा केला आहे. राज्याची जनता या वेदना कधीही विसरणार नाही. हा महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण' असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. महाराष्ट्रातील जनता आणि शिवसेना हे विसरणार नसल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर (Maharashtra) आघात केला आहे. त्यामुळं भाजपला माफ करायचे की नाही हे जनता ठरवेल असंही राऊत म्हणाले. मात्र, जनता त्यांना माफ करणार नसल्याचा उल्लेख राऊतांनी केला.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: तुम्ही माफीचं वाटप करायला बसलात का? राऊतांचा फडणवीसांना सवाल
विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिला, त्याचा बदला घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. मात्र, आता आम्ही सर्व विरोधकांना माफ केल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं. तुम्ही काय माफीचं वाटप करायला बसलात का? असा सवालही राऊतांनी फडणवीसांना केला. आम्ही त्यांच्याकडे आम्हाला माफ करा अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केली नाही. आम्ही ठरावयाचे आहे त्यांना माफ करायचे की नाही असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशाचा वापर करुन भाजपने फोडला आहे. हा महाराष्ट्र राज्यावर केलेला आघात असल्याचे राऊत म्हणाले. भाजपबरोबर मैत्री करणार का? असेही राऊतांनी विचारण्यात आले, त्यावेळी भाजपबरोबर हात मिळवणी करणार नसल्याचे संजय राऊतांनी सांगितले.
Sanjay Raut on Nagaland election : नागालँडमध्ये भाजपचे सरकार नाही
नागालँडमध्ये (Nagaland) भाजपचे सरकार आलेलं नाही. भाजप तिथे सहयोगी पक्ष असल्याचे संजय राऊत म्हणाले. यापूर्वी देखील नागालँडमध्ये एकत्रीत सरकारचा प्रयोग झाला होता. तिथे आता स्थानिक सरकारच्या पक्षामध्ये भाजप सामील झाल्याचे राऊत म्हणाले. एकत्रित सरकार होणं ही त्या राज्याची गरज आहे. कारण नागालँड हे एक संवेदनशील राज्य असल्याचे राऊत म्हणाले. तिथे सातत्यानं सीमेवर घडामोडी होत असतात. विकासाच्या दृष्टीनं काही पावलं टाकता यावीत म्हणून हा निर्णय घेतल्याचे राऊत म्हणाले. मात्र, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी कमी पडत असल्याचे राऊत म्हणाले. नागालँडमध्ये सुरक्षाविषयी परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: