Maharashtra Navnirman sena : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन (MNS Anniversary) आहे. मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गडकरी रंगायथन ठाणे इथं ही सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान,मनसेकडून नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माण सज्ज! अशा आशयाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


मनसेची शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी


9 मार्च 2006 साली स्थापन झालेल्या मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त गडकरी रंगायथन येथे सायंकाळी सहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर 'साहेब' असे फलक लावून मनसेने वातावरणनिर्मिती केली आहे. सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेंनी राज्यातील अनेक ठिकाणी दौरे केले होते. तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. त्यानंतर आज संघटनेच्या वाटचालीसंदर्भात राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 






दरम्यान, काही दिवसापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात देखील राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.  


राज्यातील राजकारणासंदर्भात देखील प्रसारमाध्यमांनी राज ठाकरेंना विचारणा केली होती. त्यावेळी राज्यातील राजकारणाचा चिखल झाला असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं होते. तसेच त्यावर मी गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले होते. त्यावेळी ट्रेलर, टीझर नाही तर पूर्ण सिनेमाच दाखवणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. 






मनसेचा टीझर प्रसिद्ध 


आज साजरा होणाऱ्या मनसेच्या वर्धापनदिनाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा टीझर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी मनसेच्या काही महत्वाच्या आंदोलनाची दृष्ये दाखवली आहेत. त्याबरोबरच राज ठाकरेंच्या भाषणातील काही भाग दाखवला आहे. यामध्ये त्यांनी 'नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माणास सज्ज'असे ब्रीद वाक्य टाकले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Raj Thackeray: पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करा, खचून जाऊ नका; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र