Ajit Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू असं सांगितलं, तेव्हापासून मला झोप येत नाही. आता राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, अशी मिश्किल टोलेबाजी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला आज नागपुरात (Nagpur) अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. 


खरी परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे


घोटाळा आमच्या काळात असो किंवा कोणाच्याही काळात असो, ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेला तो बाहेर आला पाहिजे. अनेक नेत्यांची प्रकरणे पुढे आली आहेत. प्रकरण लक्षात आल्यानंतर कुणाच्या काळात होतं हे बघण्याचं कारण नाही. खरी परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. काल (28 डिसेंबर) विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर झाले आहे. आता विधान परिषदेतही मंजूर होईल. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. मात्र, सगळ्या बाजूने मजबूत असं विधेयक असायला हवं असेही अजित पवार म्हणाले. आम्ही विधान परिषदेमध्ये आमच्या लोकांना सांगू की, त्यांनी अभ्यास करावा आणि त्यावर मत मांडावीत असे पवार म्हणाले.


वाचा नेमकं कोण काय म्हणाले? 


मागच्या काही महिन्यांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीतलं राष्ट्रवादीचं घड्याळ बंद करण्याचा इशारा दिला होता. यावर विधानसभा अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनात आणलं तर बावनकुळे तुमचाच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. अजित पवार यांच्यात फार हिंमत आहे असं वाटलं होतं, लढवय्ये आहेत असं वाटलं. पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये इतका फरक पडला. माझ्या एका दौऱ्याने अजित पवार यांना इतकी भीती वाटत आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत, असे बावनकुळे म्हणाले होते. अजित पवार यांच्यात एवढी हिंमत नाही अजून की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतील असे बावनकुळे म्हणाले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत युती असून देखील राष्ट्रवादी कधी 75 च्या वर गेली नाही, ते काय करेक्ट कार्यक्रम करतील, असे बावनकुळे म्हणाले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. बावनकुळे यांनी करेक्ट कार्यक्रम करू असं सांगितलं, तेव्हापासून मला झोप येत नाही. आता राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, अशी मिश्किल टोलेबाजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Bawankule : जयंत पाटलांबाबतीत अध्यक्षांनी बरोबर निर्णय घेतलाय, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा घणाघात