Maharashtra Political News : नागपूर (Nagpur) आणि बीड (Beed) यांचे संघर्ष पहिल्यापासून चालत आले असून नितीन गडकरी (Nitin Gadkari) जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना ट्रॅपमध्ये अडकवत होते, असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एका जाहीर सभेत केला आहे. आता देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना अडकवत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांची यात्रा महाप्रबोधन यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातील सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.


सुषमा अंधारे यांचा संभाजी भिडेंवर पलटवार


टिकली वरुन एका महिला पत्रकाराला बोलणारे संभाजी भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी करत भिडे गुरुजींवर पलटवार केला आहे. मुंबईच्या महिला पत्रकाराला मुलाखत घेताना टिकली नाही म्हणून मी बोलत नाही, असे वक्तव्य भिड़े गुरुजी यांनी केले होते. दरम्यान, अमृता फडणवीस यांना मंगळसूत्र घातले की, मला गळा आवळल्यांसारखे होते, त्यामुळे संस्कृती जपणारे भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांना जाब विचारतील का? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला आहे.



आणि सुषमा अंधारे जाहीर सभेत झाल्या भावूक


सुषमा अंधारे यांची यात्रा महाप्रबोधन यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातील सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपल्या मुलीच्या फोटो भेट स्वरुपात पाहून सुषमा अंधारे जाहीर सभेत रडल्या. मागील महिनाभरापासून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या चिमुकलीची भेट न होत असल्याने त्या भावुक झाल्याचे चित्र भंडारा येथील सभेदरम्यान पाहायला मिळाले. भंडारा येथील पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना त्यांच्या छोट्या मुलीचा एक फोटो सप्रेम भेट दिल्यानंतर त्या जाहीर सभेत भावूक होताना दिसल्या.


'कर भाषण आणि घे राशन'
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे यांनी 'ऊठ दुपारी आणि घे सुपारी' असा टोला राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला होता. यावर राजू पाटील यांनी 'कर भाषण आणि घे राशन' असं म्हणत सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलंय.


 



इतर महत्वाच्या बातम्या


'पक्ष बांधणीच्या आड कुणी आला तर त्याला तुडवा अन् पुढे व्हा, मी वकिलांची फौज उभी करतो' : राज ठाकरे