Congress : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेल्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेच्या पार्श्वभूमीवर तसेच गांधी जयंतीनिमित्त मुंबई कॉंग्रेसच्या (Mumbai Congress) वतीने "नफरत छोडो, भारत जोडो" यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेला काल मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरुवात करण्यात आली. मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचून यात्रेची सांगता झाली. मुंबई काँग्रेसच्या या यात्रेत भाजप, आम आदमी पार्टी, एआयएमआयएम, समाजवादी पक्षाचे नेते वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, शिवसेनेचे उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचाही सहभाग होता. या संपूर्ण प्रवासात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मुंबई काँग्रेस एकीकडे एकजुटीचा नारा देत राहिली, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते या यात्रेत दिसले नाहीत. या यात्रेत सामील होण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 100-150 कार्यकर्तेच दिसून आले.


शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वाढती मैत्री- अबू आझमी


समाजवादी पार्टी, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत भाजप सरकार हिंदू-मुस्लिम यांच्यात द्वेष पसरवू इच्छित आहे. दोन्ही समाजाचे लोकं म्हणून या मुंबई काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होऊन आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की, भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत असे अबू आझमी म्हणाले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत त्यांनी काँग्रेस पक्षाला, काँग्रेस नेत्यांना आणि त्यांनी आखलेल्या धोरणांना विरोध करत राहिले. मात्र बदलत्या काळानुसार महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत काँग्रेस सत्तेत सहभागी झाली, यावरूनच उद्धव गटातील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाढत्या मैत्रीचा अंदाज येईल. 


 मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष 


यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे स्मरण केले. मुंबई काँग्रेसकडून एकता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठीच ही यात्रा काढण्यात आल्याचे बोलले जात असले, तरी या यात्रेच्या माध्यमातून आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत ताकद दाखवून तसेच विरोधी एकजुटीचा नारा देत मतदारांना आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Congress President Election : नव्या अध्यक्षांना काम करण्याची मोकळीक मिळाली नाही तर आवाज उठवत राहू; पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा


मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा