Kishori Pednekar On Shinde Group : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी मुंबईतील बीकेसीत (BKC Dasara Melava) आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि  (Shivsena) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यांनी उपस्थिती लावली होती. यावर तसेच एकंदरीत कालच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर माजी महापौर तसेच शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी 'सख्खे भाऊ पक्के वैरी' असे सांगत शिंदे गटावर सडकून टीका केलीय. 


उद्धव ठाकरेंनी कधीही नातेवाईकांचं भांडवल केलं नाही - किशोरी पेडणेकर


काल दसरा मेळाव्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्याच खुर्चीवर जयदेव ठाकरे पाहायला मिळाले आणि त्यांनी राजकीय व्यासपीठावरुन भाषणही केलं. यावेळी त्यांनी मोठं विधानही केलं, म्हणाले, एकनाथला कधीच एकटा नाथ होऊ देऊ नका ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. सगळं बरखास्त करा आणि परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्यात. त्यांच्या या विधानावर आता सर्वच राजकीय पक्षातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.  शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी कधीही नातेवाईकांचं भांडवल केलं नाही, सख्खे भाऊ पक्के वैरी ही म्हणीप्रमाणे ते वागले. भाऊबंदकी यांनी स्टेजवर आणून दाखवली, त्यात नवीन काय? असं म्हणाल्या.


"ठाकरे घराण्याच्या भाऊबंदकीच्या आधारावर शिंदे गटाचं राजकारण""
ठाकरे घराण्याच्या भाऊबंदकीवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'मी कोणाचंही नाव घेणार नाही, भाऊबंदकीचा त्रास बाळासाहेबांना देखील झाला. त्या घराण्यातील भाऊबंदकीवर मी बोलणार नाही. मात्र, त्याचा आधार घेऊन शिंदे गट काही राजकारण करत असेल तर निंदनीय आहे


"शिंदेंच्या स्टेजवरचे लोक डुलक्या काढत होते"
कालच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर माजी महापौर तसेच शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, शिंदेंच्या स्टेजवरचे लोक डुलक्या काढत होते, आणि केसरकर तर चक्क झोपले होते


"कोणाच्या गर्दीत चैतन्य?"
दसरा मेळाव्यानिमित्त काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकमेकांवरील आरोपांची तोफ धडाडली. यावेळी शिवाजी पार्क आणि बीकेसीत कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावर पेडणेकर म्हणाल्या की, दोन्ही मेळाव्याच्या गर्दीबाबत सगळेजण वेगवेगळे आकडे सांगतायेत. पण कोणाच्या गर्दीत चैतन्य होतं ते बघा


"विद्यापीठात दारुच्या बाटल्यांसोबत आणखीही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या"


मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी व्यवस्था केली होती, त्या जागेत मद्यपान करून मोठ्या प्रमाणात बाटल्या फेकल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. तसेच या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या युवा सेनेनं केली आहे. यावर किशोरी पेडणेकर म्हणतात, उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यांनी विद्यापीठात जे गैरप्रकार झालेत त्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे.