Sugar Export : देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन (sugar production) झालं आहे. जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि सर्वाधिक ग्राहक असलेला देश म्हणून भारत उदयाला आला आहे. साखर निर्यातीत (Sugar Export) भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 109.8 लाख मेट्रीक टन (LMT) साखरेची विक्रमी निर्यात करण्यात आली आहे. तसेच इथेनॉल (ethanol) उत्पादनासाठी 35 लाख मेट्रीक टन साखरेचा वापर करण्यात आला. इथेनॉल विक्रीतून साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना 18 हजार कोटींचं उत्पन्न मिळालं आहे.
साखर हंगाम 2021-22 मध्ये 359 लाख मेट्रीक टन साखरेचं उत्पादन झालं आहे. यामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 109.8 लाख मेट्रीक टन (LMT) साखरेची विक्रमी निर्यात करण्यात आली आहे. 2021-22 हंगामातील आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही आर्थिक साहाय्याशिवाय आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सुमारे 109.8 एलएमटी इतकी विक्रमी साखर निर्यात झाली. आधारभूत आंतरराष्ट्रीय किंमती आणि भारत सरकारच्या धोरणामुळे भारतीय साखर उद्योगाने हे यश साध्य केलं आहे. या निर्यातीतून देशासाठी 40 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झालं आहे.
साखर कारखान्यांकडून 1.18 लाख कोटींहून अधिक किंमतीचा ऊस खरेदी
साखर हंगाम 2021-22 दरम्यान, साखर कारखान्यांनी 1.18 लाख कोटींहून अधिक किंमतीचा ऊस खरेदी केला आहे. भारत सरकारकडून कोणतेही आर्थिक सहाय्य (अनुदान) न घेता 1.12 लाख कोटींहून अधिक पैसे चुकते केले आहेत. इथेनॉलच्या विक्रीतून 2021-22 मध्ये साखर कारखानदारांनी सुमारे 18,000 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. यामुळं शेतकऱ्यांची ऊसाची थकबाकी लवकरात लवकर देण्यात मोठी मदत झाली आहे. ऊसाची मळी/साखर-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल उत्पादन क्षमता वर्षाला 605 कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दिशेनं प्रगती सुरु आहे.
यंदा महाराष्ट्रात 138 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज
2021-22 या वर्षी भारतानं साखरेचं विक्रमी उत्पादन करुन जगात ब्राझिलची मक्तेदारी मोडीत काढत साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या वाढत्या किंमतीचा लाभ घेण्यासाठी ब्राझीलने साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर दिल्याने भारताने साखर निर्यात खुली केली. देशातील किनारपट्टीला लागून असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमधून विक्रमी साखरेची निर्यात करण्यात आली होती. नव्या गळीत हंगामात देशात अंदाजे 355 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. तर महाराष्ट्रात 138 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. देशाला दरवर्षी लागणारी 275 लाख मेट्रिक टन साखर व मागील वर्षीचा 60 लाख मेट्रिक टन एवढा साखर साठा गृहीत धरल्यास यावर्षी सुद्धा किमान 80 लाख मेट्रिक टन साखर निर्यात होणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: