Nashik Civil Hospital : अमरावती (Amravati) जिल्हा रुग्णालयातील (Civil Hospital) एसएनसीयु विभागात व्हेंटिलेटरला (ventilator) शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने याबाबतीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्या कंपनीने राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर दिले होते. ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु विभागाचे दोन व्हेंटिलेटर बंद ठेवण्यात आले आहेत. 


अमरावती रुग्णालयात (Amravati Hospital) शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. राज्यात हापकिन स्तरावरून एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून हे व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. कंपनीकडून पुरवठा झालेल्या या रुग्णालयातील व्हेंटिलेटरला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने आरोग्य विभागाच्या सहसंचालकांनी अमरावतीच्या घटनेची दखल घेत राज राज्यातील जिल्हा रुग्णालयांचे जिल्हा शल्यचिकित्सक संस्थाप्रमुख व आयपीएससी सामान्य बायोमेडिकल इंजिनिअर यांनी संबंधित कंपनीचा सर्व व्हेंटिलेटरची तपासणी मे एओव्ही यांच्याकडून करून घेण्याचे आदेश दिले आहेत. हे व्हेंटिलेटर वापरण्यास योग्य आहेत किंवा नाही असा अहवाल एओव्ही यांनी दिल्याशिवाय त्याचा वापर करू नये,असे आदेशात म्हटले आहे. व्हेंटिलेटर हे मॅपिंग करून घेण्यात यावे ही उपकरणे लाइफ सेविंग उपकरण म्हणून गणली जातात. उपकरणे सुस्थिती व चालू स्थितीत राहतील याची दक्षता घेण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. 


नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन (Dr. Zakir Hussein) रुग्णालयातील सर्व मागील दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे सध्या या 160 खाटांच्या रुग्णालयात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. यामुळे या रुग्णालयातील प्रसूतीगृह सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून होत असताना सोयीच्या ठिकाणी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडून आता पुन्हा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात येण्यास नकार दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक महापालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रसूती गृह बंद असल्याने महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोना काळात नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील वॉर्ड बंद असल्याने तसेच उपचारासाठी रुग्ण नसल्याने रुग्णालय सध्या ओस पडलेले आहे. 


प्रसूतीगृह दोन वर्षांपासून बंदच
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर महापालिकेच्या मुख्य कोविड रुग्णालय असलेले डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे वापर पुन्हा सर्व रुग्णांसाठी करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. तसेच या रुग्णालयात प्रसूती गृह पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात एका महिन्यात साडेचारशे अधिक प्रसुती होत असायच्या मात्र कोरोना आल्यापासून रुग्णालयातील प्रसूती गृह बंद करण्यात आले होते. यामुळे या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतली. मात्र आता प्रसूतीगृह सुरू करण्याचे प्रयत्न होत असताना मात्र कर्मचाऱ्यांकडून येण्यास टाळा केली जात असल्याचे समोर आले आहे