Maharashtra Political Crisis : आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष 'वेट अँण्ड वॉच'च्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदेच्या भूमिकेनंतर शिवसेना पुढचं पाऊल काय उचलणार याकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व नेते आणि मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काल शिवसैनिक तसेच नाराज आमदारांशी संवाद साधला. तसेच तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची उद्या बैठक बोलावली आहे.


...त्यामुळे सर्वच आमदार हजर राहणार


राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना आज होणाऱ्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. या बैठकीत शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच बैठकीबाबतची अधिक माहिती राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी काल दिली आहे. “आज मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्व मंत्री एकत्र आलो होतो. उद्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. असे ते म्हणाले. शरद पवार यांची बैठक आहे. त्यामुळे सर्वच आमदार हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे,” असे भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.


राज्यातील राजकीय नाट्य सुरू, आजचा दिवस महत्त्वाचा
महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असून आज तिसऱ्या दिवशी नाराजी नाट्य सुरू रहाणार असल्याचं स्पष्ट आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्य निर्माण झालेला पेच कसा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालत समोर या मी राजीनामा तयार ठेवतो असं म्हंटलं. या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले असून उदय सामंतही गुवाहाटीला पोहचत आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी काय घडामोडी घडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप 


Uddhav Thackeray : कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला..., 'वर्षा'ते 'मातोश्री' दरम्यान शिवसैनिकांची तुफान गर्दी आणि घोषणाबाजी