Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) दृष्टीने निर्णायक दिवस असणार आहे. कारण आज महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय होणार आहे.
राज्य सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, यात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा,राज्यपाल व विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय उपेक्षित आहे
या याचिकांवर होणार सुनावणी
शिंदे गटाची याचिका - उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात याचिका.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची याचिका
शिवसेनेची याचिका - विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा याचिका.
संबंधित बातम्या