Amruta Fadnavis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस यांनी माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आणखी काय म्हणाल्या अमृता फडणवीस?


अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट; "फडणवीस रात्री वेश बदलून..."


अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील सभागृहातील एका भाषणात सरकार स्थापनेसंदर्भात अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. शिंदे म्हणाले होते की, सत्तांतर काही एका दिवसात झालं नाही, मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो. असंही शिंदे म्हणाले होते.


देवेंद्र फडणवीसबाबत गर्व


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाही, याबाबत मला गर्व वाटत होता. की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले, तसेच मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही फरक पडणार नव्हता. असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.


 


 



 


..अन् महाविकास आघाडी सरकार कोसळलं


शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. विशेष म्हणजे, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात नवं सरकार स्थापन झालं.शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह 21 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics : शिंदे समर्थक आमदार मतदारसंघात परतणार; कुठे स्वागत, कुठे विरोध?