Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापुरात शिवसेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरा करण्यात येतेय. डॉल्बी आणि डिजिटल बॅनरचा खर्च टाळून शिवसेना सोलापूर उत्तर विभागाच्या पदाधिकऱ्यांनी गरजू मुलींच्या शिक्षणाला मदत केली. सोलापुरात कोणतीही जयंती असली तरी डॉल्बी आणि डिजिटलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात आवाहन केले जात आहे. डॉल्बीमुळे होणारा त्रास आणि डिजिटल बॅनरवर होणारा खर्च लक्षात घेता शिवसेना उत्तरं विभागाने विचारांची शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. आज छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर सरस्वती विद्यामंदिर या शाळेला 55 हजार रुपयांची देणगी दिली. ज्या विद्यार्थिनींनी शाळेची फी भरलेली नाही किंवा अर्धवट फी भरली आहे अशा विद्यार्थिनींची फी या रकमेतून करण्यात यावी अशी विनंती शिवसेनेतर्फे शाळेला करण्यात आली. " छत्रपती शिवरायांची जयंती ही विचारांनी साजरी व्हावी आमचा उद्देश आहे. त्यामुळे यंदा डॉल्बी आणि बॅनरचा खर्च टाळून आणि 55 हजार रुपयांची देणगी शाळेला दिली आहे. भविष्यात ही देणगी पाच लाख रुपयांपर्यंत कशी घेऊन जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोलापुरातील इतरही मंडळांनी डॉल्बी बॅनरचा खर्च टाळून गरजवंतांना मदत करावी " असे आवाहन शिवसेना उत्तरचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी केले. त्यांनी या केलेल्या कार्याचे संपूर्ण सोलापुरात कौतुक होत आहे
मुंबईतुन लोकसभेसाठी कांग्रेस नेत्यांची रस्सीखेच
माजी मंत्री अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी लोकसभेसाठी केली मागणी
मुंबईत अल्पसंख्याकांसाठी एक जागा देण्यासाठी अस्लम शेख यांचा आग्रह
प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडे केली मागणी
देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षण झुलवत ठेवायचं असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. शिंदे फडणवीस पवार सरकारने एक अध्यादेश काढून केंद्र सरकारकडे पाठवला तर केंद्रामध्ये भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे भाजपाची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकतं मात्र फडणवीस ठरवून ओबीसी मराठा वाद लावून पहात आहेत. त्यांना ओबीसींची देखील अजिबात काळजी नाही. ओबीसी नेत्यांची देखील काळजी नाही असं असतं तर अशोक चव्हाण ऐवजी त्यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती. गोपीनाथ मुंडे यांची बॅग सांभाळणारे फडणवीस त्यांच्याच मुलीचं राजकारण संपवू पाहत आहेत. असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आज पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग रोखून धरल्याने सकाळीपासून कोणतेही वाहन येऊ शकले नसून एकही वाहन बाहेर पडू शकलेली नाही . सातारा पुणे या मार्गावरून येणाऱ्या मार्गावर वाखरी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केल्याने सातारा व पुणे मार्गावरून येणारी शेकडो वाहने अडकून पडली आहेत . गोपाळपूर चौकात केलेल्या चक्क जॅम मुले मंगळवेढा आणि कर्नाटक मधून येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे . याशिवाय कासेगाव येथे सुरु असलेल्या चक्का जाम मुले कोल्हापूर आणि कोकणातून येणारी वाहतूक थांबली आहे . याच पद्धतीने नदीच्या पलीकडे तीन रस्त्यावर रास्ता रोको केल्याने मराठवाडा कडून येणारी सर्व वाहतूक अडविण्यात आलेली आहे . आज सकाळी नऊ वाजल्यापासून या चक्का जाम सुरु झाल्याने पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर अभूतपूर्व वाहतूक जाम बनला आहे . या रास्ता रोकोमुळे पंढरपूरातून देखील वाहने बाहेर पडू शकत नसल्याने सर्वच मार्गावर शेकडो एसटी बसेस अडकून पडल्या आहेत . सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असून सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन केले जात आहे . या रास्तारोकोमुळे प्रवासी हैराण झाले असून पोलीस आणि महसूल प्रशासन आंदोलकांशी चर्चा करीत लवकर हा रास्ता रोको मागे घेण्याच्या प्रयत्नात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील डिगस- सुर्वेवाडी परिसरात गवा रेड्यांनी धुमाकूळ घालत वायंगणी भातशेतीसह चवळी, मका, उडीद, कुळीथ, मिरची, भुईमूग आदी पिकांची नासधूस करून नुकसान केले. रात्रीच्या वेळी या गवा रेड्यांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने या वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गवारेड्यांचा वावर सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी. तसेच नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
रायगड लोकसभेचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची सभा होत असून नगरोत्थान योजनेतून म्हसळा नगरपंचायत ला मिळालेल्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे निमित्त जरी भूमिपूजनाचे असले तरी याच शहरात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडली होती आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप सह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील खरपसून समाचार घेतला होता त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी याला प्रतिउतर देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची चर्चा सर्वत्र आहे त्यामुळे नेमकं अजित पवार यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून नांदेड लोकसभा जागेसाठी ४ नवीन प्रभारींची नियुक्ती
अनिल पटेल
सिद्धार्थ हत्तिहंबीरे
युसूफ पठाण
मुजहिद खान
अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडल्यानंतर नांदेड जिल्ह्यात अजून किती काँग्रेस नेते पक्ष सोडणार आणि त्या जिल्ह्यातील वस्तुस्थिती या प्रभारीकडून जाणून घेण्यात येणार आहे. दोन दिवसात ही समिती कांग्रेसला अहवाल सादर करणार
चंद्रलाल मेश्राम काय म्हणाले ?
मला कोणतेही कारण न देता आयोगातून वगळण्यात आले.
आयोगाचे आधीचे अध्यक्ष आनंद निरगुडे आणि इतर सदस्यांवर सरकारचा दबाव होता. त्यांनी सरकारच्या हातातील बाहुले बनण्यास नकार दिला.
आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्याची तारीख संशयास्पद.
संदिप शुक्रे यांनी अहवाल सरकारला सादर करण्यापुर्वी कोणत्याही सदस्याला वाचायला न देता त्यावर सह्या घेतल्या.
संदीप शुक्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर टर्म ऑफ रेफरन्स न बदलताच सर्वेक्षण केल्याची महित आहे. तसे झाल्यास जे सर्वेक्षण झाले त्याला ट्रिपल टेस्ट आणि इम्पीरीकल डेटा म्हणता येणार नाही.
या सर्वेक्षणाचा अहवाल आणि त्याआधारे दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे मी लिहून देतो.
माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही तर मराठा समाजाच फसवणूक होऊ नये अशी माझी इच्छाय.
सगेसोयरेच्या व्याख्यासह मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणुन परभणीत दुसऱ्या दिवशीही मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत.परभणीच्या सेलू-परतूर महामार्गावरील हदगाव खुर्द येथे रस्त्यावर टायर जाळून आणि जागोजागी काटेरी झुडपे, दगडे आडवे लावून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.या मार्गावरची वाहतूक मराठा समाज बांधवांनी बंद केली आहे.त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव पाटीवर कालपासून रास्तारोको आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा यासाठी हे रास्तारोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय आसा आरोप आंदोलकांनी केला आहे. तर जो पर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
ज्याने पक्ष काढला त्याचा पक्ष नेला, असं देशात कधीच घडलं नाही. हा निकाल कायद्याला धरून नाही. आपण कोर्टात गेलो आहे. मी अनेक निवडणूक अनेक चिन्हवर लढलो.
एखाद्याच्या वाटत असेल की एखाद्याची चिन्ह काढून घेतली तर त्याचं अस्तित्व काढून घेऊ तर तसे होत नसतं. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल, ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
माढा मतदारसंघ मला माहित आहे. जर तुम्ही शक्ती पणाला लावली की आपला उमेदवार निवडून येईल. लवकरच उमेदवार जाहीर होईल. लोकांपर्यत जावा, असे शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत आणि हिंगोली या तीनही आगारातील बस सेवा बंद. त्यामुळे 500 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी जागोजागी सुरू असलेल्या रास्ता रोको मध्ये बसचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काल हिंगोली जिल्ह्यातील वसमत आगाराच्या बसला खांडगाव पाटीजवळ पेटवून देण्यात आले होते. तर शिरड शहापूर येथे सुरू असलेल्या रास्ता रोको मध्ये बसवर दगडफेक सुद्धा करण्यात आली होती. असे नुकसान टाळण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरामध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतोय .
छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट सुरु आहे. आधी 10 तासांचा शटडाऊन, त्यात दोन ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांत शहारत पाणीच आलं नाही. पाणीपुरवठ्याचे टप्पे दोन दिवस पुढे ढकलण्याची महानगरपालिकेवर नामुष्की ओढावली आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नाशिकच्या मनमाड शहरात लोकार्पण सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरून जलतिर्थ आणण्यात आले आहे..या जलतिर्थाने छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विधिवत मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात येवून त्यानंतर पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे..आ.सुहास कांदे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजुम कांदे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारला असून शिवजयंतीच्या निमित्ताने पूर्वसंध्येला ह्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.
गावामध्ये हिंदू स्मशानभूमी नसल्याने सोलापुरातील उळे गावात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून गावात सम्शानभुमी नसल्याने उळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावात 14 एकर पाझर तलाव आहे. हे तलाव कोरडे असून अनेकांनी यावर अतिक्रमण केले आहे. शासनाने याची मोजणी करून तिथे स्मशानभूमी करून द्यावी अशी मागणी उळे येथील गावातील नागरिक करत आहेत. अन्यथा यापुढे रस्त्यावरती अंत्यसंस्कार न करता तहसीलदार कार्यालयातच अंत्यविधी करू असा इशारा देखील स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
नागपूर - कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून गेला आहे. मागील काही दिवसात या राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं भंडारा शहरात वाहतुकीचा खोळंबा होतं असल्यानं महामार्गावर प्रचंड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यातून आपलं वाहन पुढे काढण्याचा सर्वच वाहन चालकांचा प्रयत्न असतो आणि यामुळंच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. यासोबतच उच्च आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी नागपूर जिह्यात तर, भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही अनेक विद्यार्थी एसटी बसनं भंडाऱ्यात येतात. मात्र, या वाहतुकीच्या खोळंबाला या विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं आहे. या ट्रॅफिक जॅम मध्ये वाहन अडकून पडल्यानं त्यातून बाहेर पडताना किमान दीड ते दोन तासांचा अवधी लागतोय, त्यामुळं शासकीय कर्मचारी असो की विद्यार्थी त्यांच्या कार्यालयात किंवा शाळा - महाविद्यालयात वेळेत पोहचू शकत नाही. अशात आता CBSE च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहे. या वाहतुकीचा खोळंबा विद्यार्थ्यांना बसत असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव पाटीवर मराठा समाज बांधवांनी नांदेड परभणी महामार्ग रोखला आहे कालपासून सुरू असलेल्या या रास्तारोको मुळे नांदेड परभणी महामार्ग ठप्प झाला आहे या रास्तारोको मुळे कालपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि मनोज जारांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा रास्तारोको करण्यात येतोय.
बोरघाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या मुळे मुंबईकर नागरिक घराबाहेर पडले आहेत.
-
मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील बस स्थानक परिसरात गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच भोवले. लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडून तब्बल ९ लाखांची रोकड पळवल्याची खळबळजनक घटना सायंकाळी घडली. संतोष मदनलाल लद्दड असे शिक्षकाचे नाव असून काल दुपारी त्यांनी मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून ९ लाख रुपयांची रोकड काढली होती. त्यांनतर दोघा अज्ञातांनी दुचाकीने पाठलाग सुरू केला होता. असे संतोष लध्दड यांनी सांगितले. दरम्यानच देऊळगाव माळी येथे मित्रांसोबत हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले असता त्यांनी गाडीत ठेवलेली रोकड अज्ञातांनी पळवली. संपूर्ण प्रकार उघडकीस येतात संतोष यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये मोटरसायकलवर चोरटे पसार झाल्याचे दिसत आहेत.गेल्या महिनाभरात अशाप्रकरची ही सहावी घटना असल्याने बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे.
जितेंद्र आव्हाडांना एवढी काळजी असती तर शरद पवार आणि अजित पवार बद्दल भावनिकता निर्माण झाली, खऱ्या अर्थाने पवारांचे घर फोडण्याचे काम शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अंतर आणायचं काम कोणी केलं असेल तर ते आव्हाड यांनी केलं, याचे अनेक पुराने साक्षी द्यायचे असतील तर अनेक जण माझ्यासहित अनेक जण साक्षी सहित पुढे येतील, फक्त आता सबंध जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे पूर्वी एकत्र असताना आता अजित पवार नेतृत्व करत आहे. आता भावनिक होऊन काय उपयोगाचे आहे. आज तुम्हाला ही भावनिकता एवढ्यासाठीच पाहिजे की, शरद पवारानंतर, जयंत पाटील सुद्धा नसावे सुप्रियाताई सुद्धा नसावे स्वतः फक्त एकटे आव्हाड पाहिजे यासाठी हा भावनिक भाबला प्रयत्न त्यांनी आमच्यावर टीका करत केला. त्यावेळी त्यांची सही त्या वेळेच्या एकूण 53 आमदारांच्या सोबत भारतीय जनता पार्टी सोबत जाताना शरद पवार यांच्या संमती सहित होती की नव्हती याचे उत्तर त्यांनी दिलं नाही आणि असे अनेक प्रसंग आहे ते कधीतरी सांगता येईल पण त्यांनी भावनिक होण्या ऐवजी भावनिक होण्याची परिस्थिती कुटुंबात निर्माण करणाऱ्या पैकी ते एक आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यात मोठा हिंसाचार झाला होता यात 30 ऑक्टोबर रोजी बीड आणि माजलगाव मधील काही नेत्यांची घरं हॉटेल आणि कार्यालय सुद्धा जाळण्यात आली होती या दरम्यान अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला काही ठिकाणी टायर जाळण्यात आले.. आता ही किरकोळ गुन्हे मागे घेण्यासाठी बीड पोलिसांनी बीड जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये प्रस्ताव दाखल केला आहे..
यावेळी एकूण 79 गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी किरकोळ स्वरूपाचे छत्तीस गुन्हे मागे घेतले जाणार आहेत ज्या गुन्ह्यामध्ये पाच लाख रुपये पेक्षा जास्त नुकसान झालेले नाही अथवा कुणाच्याही जीविका धोका झाला नाही असेच गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.. ज्या गुन्ह्यामध्ये पाच लाख रुपयापेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले आहे आणि जीवित आणि किंवा जीवितास धोका निर्माण झाला अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे न घेता तपास सुरू ठेवला जाईल असं पोलीस विभागाने कळवले आहे
डीप क्लिनिंग ड्राईव्हसंदर्भात पालिका आयुक्तांची मोठी घोषणा
दर शनिवारी डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरु असलेल्या ठिकाणावरुन वाॅर्ड आॅफिसरांना (पालिका उपायुक्त) हजर राहण्याची सक्ती
उपायुक्तांना महापालिका आयुक्तांना लाईव्ह लोकेशन टाकणं बंधनकारक
ड्राईव्हवेळी पालिका उपायुक्त हजर न राहिल्यास आयुक्तांकडून कारवाई करण्याची तंबी
२४ वाॅर्डमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्हला यंत्रणांची उपस्थिती बंधनकारक
मुंबई कोस्टल रोडचं उद्घाटन याच महिन्यात होणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माहिती दिली. वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा सुरु होणार आहे. मात्र दौरा रद्द झाल्याने लोकार्पण लांबणीवर पडलं होतं. येत्या काही दिवसातच पंतप्रधान यांचा पुन्हा मुंबई दौऱ्यादरम्यान उद्घाटन होणार
Manoj Jarange Patil News : कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण (kunbi caste certificate) आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना नवं आरक्षण (maratha reservation) असं सांगणं चुकीचं आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावीच लागेल, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अंतरवाली सराटीतून (Antarwali Sarathi) बोलत होते. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालवली होती, त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतलाय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण 20 तारखेला निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इसारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. यावेळी त्यांनी 10 टक्के आरक्षण ही टक्केवारी कशी आणली हे माहित नसल्याचं सांगितलं. त्याशिवाय सगेसोयरेची अंमलबाजवणी करावीच लागेल, असेही सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, ही प्रमुख मागणी आहे. 20 तारखेला अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाधान मिळाले. पण जर व्यवस्थित आरक्षण मिळाले नाही, तर पुढील अधिवेशनाची दिशा तात्काळ ठरवली जाईल, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 20 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.
Solapur : सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचे अंदाज पत्रक सादर केले. 1 हजार 157 कोटी 23 लाख रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्तानी सादर केले. यातील प्रशासकीय जमा-खर्चाचे अंदाजपत्रक 710 कोटी रुपयांचे आहे. शासनाकडून विविध प्रकारचे 369 कोटींचे अनुदान आणि कर्जरूपाने 76 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. दरम्यान नागरिकांसाठी आगामी वर्षांत घरपट्टी किंवा पाणीपट्टी वाढणार नाही. मात्र, उत्पन्नवाढीसाठी शासन निर्देशानुसार मेजर आणि मिनी गाळ्यांची भाडेवाढ होणार आहे. मागील वर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजात केवळ दोन कोटी रुपयांची तूट दिसली. त्यामुळे यावर्षीही आकडे न फुगविता वास्तववादी अंदाजपत्रक सादर केल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली..
Chiplun : चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते विरोधात गुन्हा दाखल
रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Maharashtra News LIVE Updates: मुंबईतील गोवंडीमध्ये आदर्श नगर परिसरात पहाटे 4 च्या सुमारास दहा ते बारा घरांमध्ये मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल एक तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही.
Maharashtra News LIVE Updates: मुंबईत बहुचर्चित अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पुलाचं काम जवळपास पूर्ण. गोखले पुलावर शेवटच्या टप्प्यात हात फिरवायचा काम सुरू आहे. मुंबई महानगरपालिकाकडून गोखले पूल एका बाजूस सुरू करण्यासाठी 25 मार्चला सातवा मुहूर्त देण्यात आला आहे. या सातव्या मुहूर्तावर मुंबईकरांचा सेवेसाठी गोखले पूल एका बाजूस सुरू करण्यात येणार आहे. गोखले पूल सुरू झाल्यावर मुंबईकरांना वाहतूक कोंडी पासून मोठा दिलासा मिळणार आहे.
मी कोणत्याही टर्म आणि कंडीशनवर पक्ष प्रवेश केला नाही. माझ्या मनात काय आहे हे साहेबांनी सांगितलं आहे. शाखा आणि महिला युवक आणि ज्येष्ठांचा मेळावा असे तीन मेळावे घ्यायचे साहेबांनी सांगितलं आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात पहिला मेळावा अती भव्य 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत घेणार आहोत. 30-40 हजार युवक वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभाच नाही तर विधानसभा जिल्हापरिषद बाजार समितीचे उमेदवार आता ठरवणार आहोत. अकोला पॅटर्न हिंगोलीमध्ये राबवणार आहोत. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला जागा सुटली तर ते आपल दुर्दैव संमजून बाळासाहेबांचा आदेश मनात काम करायचं. युती जरी झाली तरी ही जागा वंचितलाच सुटेल, साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं मला लोकसभा लढवायची आहे, असे बीडी पाटील यांनी सांगितलं.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -