Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, पुढील सुनावणी 11 जुलै रोजी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा आज सातवा दिवस आहे. प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jun 2022 05:44 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं...More

आदित्य ठाकरे यांनी हाॅस्पिटलमध्ये जाऊन घेतली जखमी शिवसैनिकाची भेट

आदित्य ठाकरे यांनी घेतली जखमी शिवसैनिकाची हॅास्पीटलमध्ये जाऊन भेट घेतीली आहे. माथेरानचे शहरप्रमुख प्रमोद सावंत यांची  भेट घेतली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांकडून करण्यात आली होती. प्रसाद सावंत यांना मारहाण झाली. जखमी झालेल्या प्रसाद सावंत यांच्यावर सुरू आहेत. कळंबोली येथील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत