Pankaja Munde Dhananjay Munde : पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माझ्यामध्ये विचाराचं वैर असलं तरी आम्ही आध्यात्मिक ठिकाणी राजकारण करत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं. आमचे विचार वेगळे असले तरी घरामध्ये मात्र तसूभरही अंतर नसल्याचे मुंडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. संत भगवान बाबांच्या नारळी सप्ताहात भारजवाडी गावात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले होते. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.


पंकजा गडाची पायरी असेल तर मी त्या पायरीचा दगड 


मी भगवान गडाची पायरी असल्याचे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. तर त्याला प्रतिउत्तर म्हणून धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा मुंडे जर या गडाची पायरी असतील तर त्या पायरीचा मी दगड आहे. गडासाठी कोणी काय केलं हे सर्वांना माहीत आहे. पंकजामध्ये आणि माझ्यामध्ये एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही आमची राजकीय लढाई वेगळी असल्याचे मुंडे म्हणाले.


आम्ही दोघे एकत्र असतो तर...


धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्याचे पाहून उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने दोघांनी कायमचं एकत्र यावं अशी विनंती केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देव करतो ते भल्यासाठीच करतो असं प्रतिउत्तर दिलं. पंकजा मुंडेही आमदार झाल्या, त्यानंतर मंत्री झाल्या. मीही आमदार झालो आणि मंत्री झालो. त्यामुळे आम्ही दोघे एकत्र असतो तर एकालाच ही संधी मिळाली असती. मात्र, आम्ही वेगळे आहोत त्यामुळं तुम्हीही समजून घ्यायला पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले. यापुढे गडाच्या संदर्भात राजकारण करणार नसल्याचं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सांगितल. 


मचे भविष्य काही वेगळं, त्यासाठी वाट पाहा : पंकजा मुंडे


धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं दोघेही आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा, त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा आहे. दोघं एकाच पाठीवरती जन्माला आलो. आमचे भविष्य काही वेगळं असेल. त्यासाठी काही वेळ वाट पाहा, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.


गेल्या अनेक वर्षापासून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. यामुळं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अनेकवेला तापल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच आमच्या दोघात बहिण भावांचे नाते काहीच उरले नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. मात्र, आता भगवानगडाच्या पायथ्याशी दोन्ही नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.


महत्त्वाच्या बातम्या:


Dhananjay Munde : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकाभिमुख घोषणांचा पाऊस: धनंजय मुंडे