12th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई आणि राजस्थान यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..


नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी -


नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिकांनी दाखल केलेला जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू आहे. नियमित कामकाज संपल्यावर दुपारी 4:30 वाजता सुनावणी सुरु होणार आहे. 


किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत.


मुंबई – किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत. मागील दोन महिने बघता महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडच्या वर बघायला मिळाला आहे. आरबीआयकडून पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातील महागाईचे आकडे वर गेल्यास पुन्हा एकदा व्याजदरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा किरकोळ महागाई दर किती राहतो हे बघणं महत्त्वाचे असणार आहे.  


पुणे – पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा


पिंपरी – सुप्रिया सुळे भोर वेल्हा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.


रत्नागिरी – सावरकर गौरव यात्रेत मंत्री उदय सामंत सहभागी होणार आहेत. 


विधान परिषद विरोधी पक्षनेते आबांदास दानवे आज निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. चांदोरी, टाकळी, विंचूर भागात कांदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. 


चंद्रपूर – 4 दिवसीय बहुजन समता पर्वात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सहभागी होणार आहेत. 
 
मुंबई – कर्नाटकच्या निवडणुका लागल्यात. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. 


 मुंबई – वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर आता आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस भारतीय प्रवाशांना मिळणार आहे. सध्या धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस या चेअर कार म्हणजेच बसून प्रवास करणाऱ्या डब्यांच्या होत्या. मात्र भारतीय रेल्वे दिलेल्या नवीन एका ऑर्डर नुसार झोपून प्रवास करता येतील अशा स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येणार आहेत. तब्बल 80 स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेसची ऑर्डर देण्यात आली आहे.  


  नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी. वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिकांनी दाखल केलेला जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू आहे. नियमित कामकाज संपल्यावर दुपारी 4:30 वाजता सुनावणी सुरु होणार आहे.


-        मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचा रखडलेला मुद्दा आणि या महामार्गावरील इतर समस्यांकरता हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी. लोकांचा रोष असूनही हातिवले टोस नाका सुरू केल्याच्या मुद्यावर आज हायकोर्टात होऊ शकतो युक्तिवाद.


-    आयसीसीआयसी बँक लोन घोटाळ्यातील आरोपी आणि व्हिडिओकॉनचे सर्वोसर्वा वेणुगोपाल धूत यांनी जामीनातील अटीशर्तींतून दिलासा मागत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनवणी.


दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अजमेर दिल्ली कॅट वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, सकाळी 11 वाजता.


बिहार – राहुल गांधीनी मोदी नावाला घेऊन 2019 मध्ये केलेल्या टिकेवरून सुशील मोदींनी राहुल गांधी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.


लाहोर – तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात लाहोर उच्च न्यायालयात इमरान खानच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.