एक्स्प्लोर

Maharashtra Omicron Cases: राज्यात आज ओमायक्रॉनच्या 91 रुग्णांची नोंद, आतापर्यंत 1682 रुग्ण बरे 

Maharashtra Omicron Cases: राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 3221 रुग्णांची नोंद झाली आहे तर 1682 रुग्ण बरे झाले आहेत. 

मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मात्र काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 91 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 3221 रुग्णांची नोंद झाली आहे तर 1682 रुग्ण बरे झाले आहेत. 

राज्यात आतापर्यंत 6716 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6626 अहवाल प्राप्त झाले आहेत. 90 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 

राज्यात आज नागपूरमध्ये 18 रुग्ण तर औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 11 रुग्णांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात प्रत्येकी 5 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 1238 रुग्णांची नोंद झाली आहे तर आजच्या दिवशी केवळ 4 रुग्ण सापडले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1062 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज 8 रुग्ण सापडले आहेत. 

राज्यातील स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 140  नव्या रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 423  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 67 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के आहे.  सध्या राज्यात 11 लाख 74 हजार 825 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची स्थिती
मुंबईत सोमवारी कोरोनाचे 960 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 623  झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 1 हजार 837 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Crime: खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, पिडीतेच्या कुटूंबियांची पोलीस ठाण्यात तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील घटना
खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, पिडीतेच्या कुटूंबियांची पोलीस ठाण्यात तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील घटना
Vijay Kumbhar On Bhimashankar Karjat Torrent Power Project: भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार; महाराष्ट्रात 23 ठिकाणी वृक्षतोड, विजय कुंभार यांच्या दाव्याने खळबळ, यादीच देऊन टाकली! 
भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार; महाराष्ट्रात 23 ठिकाणी वृक्षतोड, विजय कुंभार यांच्या दाव्याने खळबळ, यादीच देऊन टाकली! 
बीडमध्ये पाणी संकटाची धोक्याची घंटा! 11 तालुक्यातील 126 विहिरींच्या पाणीपातळीचा धक्कादायक रिपोर्ट; नेमकी परिस्थिती काय?
बीडमध्ये पाणी संकटाची धोक्याची घंटा! 11 तालुक्यातील 126 विहिरींच्या पाणीपातळीचा धक्कादायक रिपोर्ट; नेमकी परिस्थिती काय?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Embed widget