अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती आणि मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त यांना आयुक्तांना नोटीस देण्यात येणार आहे. लोकसभा सचिवालयात 9 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी जबरदस्तीने थांबवून अपशब्द वापरले, असा आरोप नवनीत राणांनी केला आहे.
15 नोव्हेंबर 2020 रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी पोलीस वाहनात खासदाराला बसवून नेल्याने आणि मुंबईला जात असतांना जबरदस्तीने थांबविणे सोबतच पोलीसांनी अपशब्द वापरल्याचं खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
प्रकरण काय आहे?
अमरावती जिल्ह्यात 2020 मध्ये प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं अशी मागणी केली होती. आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणानी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली.
14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते. पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते.
यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या. आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार आहे. याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली. त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि खासदार हिना गावित यांच्या स्वाक्षऱ्या देखील होत्या.
अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.