मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि अंबादास दानवेंवर (Ambadas Danve) गंभीर आरोप केले आहेत. राऊत आणि दानवे सातत्याने वक्तव्य करत विधानसभा अध्यक्षांवर जाणीवपूर्वक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा नितेश यांनी केला आहे. या दोन्ही नेत्यांवर विशेषधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी नितेश यांनी विधीमंडळ सचिवांना पत्र लिहून केली आहे. लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे, असंही नितेश यांनी आपल्या पत्रात लिहिलंय.  


संजय राऊत यांनी अध्यक्षांबद्दल  केलेली वक्तव्ये



  • “संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?' 

  •  “आम्ही करू ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाया राहणारनाही."

  • "विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत. "


अंबादास दानवे यांनी केलेले वक्तव्य



  • "उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करीत आहेत. "


नेमकं काय म्हणाले नितेश राणे पत्रात? 


विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या पक्षांतरबंदीविषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्ये  संजय राऊत आणि अंबादास दानवे या दोन्ही व्यक्तींचे  राजकीय हितसंबंध आहेत. अध्यक्षांविरोधात वरील वक्तव्ये करून विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्यात येत आहे.  विधानसभा अध्यक्षांचा आणि पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे. यांचे अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.  यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करतो. संजय राऊत व अंबादास दानवे यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्काळ सुपूर्द करावे आणि यावर  विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे.


 आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी


 आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification Case) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष आज पुढची सुनावणी  घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुपारी तीन वाजता शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात दुसरी सुनावणी पार पडणार आहे. 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी या प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जात आहे.  


हे ही वाचा :