मुंबई : मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे (MLA Houses In Mumbai) कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अधिवेशनात (Maharashtra budget session)केली. यानंतर या निर्णयावरुन अनेक मतमतांतर येत आहेत. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आमदारांना घरे देण्याचा महविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरे द्यायला नकोत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 


गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून आमदारांना घरं द्या : शरद पवार


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.  गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या, अशी पवारांची भूमिका आहे. लवकरच शरद पवार या विषयवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शरद पवारांचा सरकाराला घरचा आहेर अशी विरोधकांची टीका होत आहे, या टीकेला मी किंमत देत नाही, असे देखील शरद पवारांनी या वेळी स्पष्ट केले आहे. 


वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी?


दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. म्हाडात सर्वसामान्यांना घरं लागत नाही, अनेक प्रश्न प्रलंबित आहे, आमदारांची कोट्यावधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7-8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या बेघर किंवा मुंबईत घर बांधण्याची ऐपत नसलेले किती आमदार, खासदार असतील राज्यात?  गावाकडे बंगले, आमदार-खासदारांच्या हौसिंग सोसायट्या, आमदार निवास एवढंच नाही तर म्हाडा लॅाटरीत आरक्षण असतानाही वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


आमदार निवास आणि आमदारांचा संबंध किती?


मुंबईमध्ये आमदारांना राहण्यासाठी सर्वसोयीनियुक्त आमदार निवास उभारण्यात आली आहेत. यासाठी अब्जावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र या आमदार निवासांमध्ये किती आमदार राहतात? हा देखील विचार करण्याजोगा सवाल आहे.


संबंधित बातम्या :


MLA Houses In Mumbai : "आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर..." जितेंद्र आव्हाडांनी केले स्पष्ट


MLA Houses In Mumbai : व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha