मुंबई : एकना शिंदेच्या बंडाला एक महिना झाला. त्यांच्या नेतृत्वात नवं सरकार येऊन 25 दिवसही झाले. शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार जरी लांबणीवर पडला असला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयात भरती सुरू झाली आहे. तर मंत्री आणि राज्य मंत्री यांच्या कार्यालयातील पदांना मंजुरी देण्यात आली आहे.  


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्य मंत्री यांच्या कार्यालयातील पदांना मंजुरी देण्यात आली आहे.  मात्र या पदांमध्ये बिगर सरकारी व्यक्तींच्या मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया पदांची नियुक्ती कशी आहे


कशी आहे पदांची नियुक्ती?



  • मुख्यमंत्री कार्यालय- 146 पद

  • उपमुख्यमंत्री कार्यालय- 72 पद

  • मंत्री अस्थापना - 15 पद

  • राज्यमंत्री अस्थापना - 13 पद


मुख्यमंत्री कार्यालय



  • प्रधान सचिव - 02( भारतीय सेवेतील)

  • मुख्यमंत्री यांचे सचिव - 01 ( भारतीय सेवेतील)

  • खाजगी सचिव - 04

  • विशेष कार्यअधिकारी - 07( बाहेरील व्यक्ती भरता येईल

  • सह सचिव/ उप सचिव - 05

  • अप्पर सचिव-02

  • स्विस सहाय्यक-04 ( बाहेरील व्यक्ती भरता येईल)

  • संचालक - 01

  •  प्रधान सचिव यांच्याकडे 15  पद

  • शिपाई - 34

  • एकूण- 146 पद


उपमुख्यमंत्री कार्यालय



  • प्रधान सचिव - 01

  • सह सचिव - 03

  • विशेष कार्यकारी अधिकारी - 07

  • खाजगा सचिव - 07

  • शिपाई -18 

  • एकूण पद - 72


संबंधित बातम्या :