Pune Passport Office Sever Down: पुण्यातील पासपोर्ट ऑफिसचा सर्व्हर डाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. पुणेकरांना काही तास सर्व्हर नीट होण्याची वाट बघावी लागली. त्यानंतर काही तासांनी सर्व्हर नीट झाल्यानंतर कामकाज सुरळीत सुरु झालं.  मात्र या काही तासांमुळे अनेक पुणेकरांना समस्यांना सामोरं जावं लागलं. सर्व्हर डाऊन असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली नव्हती त्यामुळे गोंधळ उडाला होता.


पुण्यासोबतच राज्यभरात पासपोर्ट ऑफिसचे सर्व्हर डाऊन झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बाजूच्या गोवा आणि गुजरात या राज्यात ही सर्व्हर डाऊन असल्याची माहिती मिळाली आहे. अमरावती पासपोर्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट काढणारे सकाळी 10 वाजेपासून बसले होते. लवकरात लवकर सर्व्हर सुरू व्हावा, अशी मागणी पासपोर्ट काढणाऱ्यांनी केली होती.


अनेक शासकीय यंत्रणा ऑनलाईन झाल्या मात्र याच यंत्रणांमधील येणाऱ्या सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे नेहमी शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं. हेच चित्र परभणीत देखील बघायला मिळालं. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी सर्व्हर सुरू होण्यापर्यंत वाट बघावी लागली.


सध्या सामान्य लोकांनाही पासपोर्टची गरज असते. कोणत्याही आयटी कंपनीत नोकरीसाठी पासपोर्ट मागितल्या जातो. त्यामुळे सामान्य लोकंही मोठ्या प्रमाणात पासपोर्ट काढायला लागले आहेत. या सर्व्हर डाऊनमुळे अनेक नागरिक खोळंबले होते. पुण्यातील घोपडीतील ऑफिसमध्ये अनेक नागरिक संतापले होते.


सध्या सगळे सरकारी कागदपत्र आणि कामकाज ऑनलाईन पद्धतीने होतं. अनेक नागरिक आता ऑनलाईन पद्धत शिकायला लागले आहेत. आधार लींक, पासपोर्ट, रहिवासी दाखला, शेतीचा सातबारा ही सगळी कागदपत्राची ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यामुळे या सगळ्या बेवसाईटवर कायम लोड येतो. अनेकदा बेवसाईट डाऊन होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पासपोर्ट ऑफिसचा सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.