नाशिक : महाराष्ट्रात (maharashtra) कांदा प्रश्न नवीन नाही. अनेकवेळा कांदा दरावरून आंदोलने मोर्चे पाहायला मिळाले. कांदा निर्यात शुल्क (Onion export duty)  वाढवल्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. अशातच नुकत्याच सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी आता या निर्णयावर तोडगा काढणे एक परीक्षाच ठरणार आहे. आज धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे दिल्लीला रवाना झाले असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा प्रश्नांवर निर्णय होणार आहे. 


एकीकडे कृषी खात्यात सातत्याने भेडसावणारे विविध प्रश्न तसेच अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त कारकिर्दीमुळे कृषीखातं स्वीकारण्यास अनेक मंत्र्यानी मंत्रीमंडळ विस्तारादरम्यान नकार दिला होता, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. धनंजय मुंडेंकडे हे खातं तर आलं, मात्र त्यानंतर काही दिवसातच केंद्राने कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्याने कांदा प्रश्न राज्यात चांगलाच पेटला असून धनंजय मुंडे हे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या भेटीसाठी दिल्लीलाही रवाना झाले आहेत. खरं तर या निर्णयावर तोडगा काढणं ही एक मोठी परीक्षाच मुंडेंसाठी आहे, कारण एकीकडे सत्तेत असल्याने पूर्वीप्रमाणे भाजप विरोधात तोंडसुख घेता नाही,  दुसरीकडे शेतकरी, व्यापारी संतप्त झाले आहेत तर विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता धंनजय मुंडे राज्यभरातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात, विरोधकांना उत्तर देण्यात कितपत यशस्वी होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.


सध्या कांदा निर्यात शुल्कच्या (Onion Issue) मुद्यावरुन शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादले आहे. याविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करतायेत. या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. धनंजय मुंडे हे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्याशी भेट घेणार आहे. तसेच या बैठकीला सुरवातही झाली असून कांदा निर्यात शुल्कावर काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्षात असताना धनंजय मुंडे यांनी अनेकवेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला. मात्र आज तेच कृषिमंत्री असल्याने कांदा निर्यात शुल्कावरून पेटलेल्या प्रश्न कसा सोडवितात हे देखील महत्वाचं असणार आहे. 


नाशिकमध्ये आज बैठक 


दरम्यान आज या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अकरा वाजता बाजार समितीचे सभापती, प्रतिनिधी, व्यापारी आणि प्रशासन यांची बैठक होणार आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित राहणार असून या बैठकीत नक्की काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. काल पहिल्या दिवशी अनेक बाजार समित्या बंद असल्याने जवळपास 20 कोटींच्या आसपासचे व्यवहार ठप्प हे झाले होते. एकट्या नाशिकमध्ये जवळपास दीड लाखांपर्यंतची कांद्याची आवक होत असते. मात्र कांद्याचे लिलाव हे झाले नाही, व्यापाऱ्यांनी माल हा खरेदी केला नाही, त्यामुळे मुंबईसह इतर ठिकाणी जाणारा माल हा गेला नाही. त्यामुळे जर लिलाव जर बंद राहिले, बाजार समितीचे व्यवहार ठप्प राहिले तर याचा परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या : .


कांदा निर्यात शुल्क:  कृषीमंत्री धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर, कृषीमंत्री तोमरांसह पियूष गोयलांची भेट घेणार