नाशिक : कांद्याच्या निर्यात शुल्काविरोधात (Export Duty) नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत स्वरूपात बंद आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आज नाशिकचे जिल्हाधिकारी, सर्व बाजार समित्यांचे सभापती, पदाधिकारी आणि व्यापारी यांच्यासोबत एक बैठक घेत आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (Nashik Collector) सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. त्यामुळे बैठकीत नेमकं काय ठरतंय? बंद मागे घेऊन बाजार समिती (Bajar Samiti) पुन्हा सुरू होणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. 


निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी आक्रमक आहेतच, दुसरीकडे आंदोलने देखील झाली. दरम्यान निर्यात शुल्क वाढविल्यामुळे साहजिकच बाहेरचे आयातदार देश आहेत, ते भारताचा कांदा (Onion Issue) घेणार नाही आणि हीच कुठेतरी भीती असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला मालाला भाव मिळणार नाही, असं कुठेतरी वाटते. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी, व्यापारी हे संतप्त झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल जिल्हाभरात तीव्र पडसाद हे पाहायला मिळाले. कुठे रास्ता रोको, कुठे सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली गेली. एकीकडे नाशिक (Nashik) हे कांद्याचे आगार समजलं जातं, त्यातच काल सोमवारच्या दिवशी बाजार समित्याच बंद करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बंद होत्या, काही ठिकाणी शेतकरी आले होते, त्यांचा माल हा घेण्यात आला. मात्र त्याला देखील जवळपास 200 ते 300 रुपयांची घसरण बघायला मिळाली. 


दरम्यान आज या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अकरा वाजता बाजार समितीचे सभापती, प्रतिनिधी, व्यापारी आणि प्रशासन यांची बैठक होणार आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित राहणार असून या बैठकीत नक्की काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. काल पहिल्या दिवशी अनेक बाजार समित्या बंद असल्याने जवळपास 20 कोटींच्या आसपासचे व्यवहार ठप्प हे झाले होते. एकट्या नाशिकमध्ये जवळपास दीड लाखांपर्यंतची कांद्याची आवक होत असते. मात्र कांद्याचे लिलाव हे झाले नाही, व्यापाऱ्यांनी माल हा खरेदी केला नाही, त्यामुळे मुंबईसह इतर ठिकाणी जाणारा माल हा गेला नाही. त्यामुळे जर लिलाव जर बंद राहिले, बाजार समितीचे व्यवहार ठप्प राहिले तर याचा परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. 


कृषिमंत्री दिल्लीला रवाना 


कांद्याची आवक कमी झाली तर भाव देखील मिळतील. यासोबतच कांदा अनेक ठिकाणी उपलब्ध देखील नसेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. सद्यस्थितीत कांदा प्रश्न हा पेटलेला असून या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. धनंजय मुंडे हे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर त्यामुळे एकंदरीतच दिल्लीत काय तोडगा निघतो. यासोबतच नाशिकमध्ये देखील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आणि कृषीमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


कांदा निर्यात शुल्क:  कृषीमंत्री धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर, कृषीमंत्री तोमरांसह पियूष गोयलांची भेट घेणार