Chhagan Bhujbal : देशाचे भविष्य हे मोदींच्या (Narendra Modi) हातात सुखरूप आहे. आम्ही आजपर्यंत टीका जरी केली असली तरीही हे सत्य नाकारता येत नाही. आम्ही अजितदादांसोबत असून काही दिवसांपूर्वीच शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं होत की, 2024 ला नरेंद्र मोदी सत्तेवर येणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य  राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. 


आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्याच्या राजकारणातील मोठा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडला आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असून त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), हसन मुश्रीफ, अनिल पाटील, अदिती तटकरे, धनंजय मुंडे आदींसह नऊ मंत्री आहेत. या सगळ्या नाट्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, येत्या काळात नरेंद्र मोदीच सत्तेवर येणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले होते. 


छगन भुजबळ म्हणाले की, देश नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे. आम्ही अजितदादांसोबत असून महाराष्ट्र सरकराचा तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत. अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अनेक राज्याचे प्रश्न आहेत, अशात भांडण करुन चालणार नाही. आज नाकारता येत नाही, मात्र देश मोदींच्या हाती असल्याने देशाचे नेतृत्व खंबीर आहे. विकासाच्या कामाला निर्णय घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत, आत राहून अनेक प्रश्न सोडवता येणार आहे. पाटण्यात विरोधी पक्ष एकत्र आले, मात्र ते नीट आले नसल्याचे देखील म्हणाले आहेत. रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नसून कोणी म्हटलं आमच्यावर केसेस आहेत. मात्र आमच्यातील अनेकांवर केस नसल्याचे भुजबळ म्हणाले. 


संजय राऊत काय म्हणाले? 


संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फार काळ मंत्रिपदावर राहणार नाहीत. लवकरच शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील. शिवाय हा काही राजकीय भूकंप नाही, एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, एक इंजिन लावून आता तीन इंजिनाचा सरकार स्थापन झालं आहे. मात्र आता एक इंजिन लावल्याने दुसरं इंजिन आपोआप बाहेर पडणार आहे. त्यामुळे या सरकारला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही. भविष्यात आम्ही सगळे एकत्र राहू, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करु असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. एकीकडे शिंदे गटाचा मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता, मात्र घडले भलतेच. शिंदे गटातील लोकांचे चेहरे पाहिलेत का? त्यांची वेदना लक्षात आली असल्याचे राऊत म्हणाले. काही दिवसांपूर्वी जे सामनातून बोललो होतो, ते खरे ठरले आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असून हे माझं भाकित नसून परफेक्शन असल्याचे राऊत म्हणाले. 


हेही वाचा


CM Eknath Shine on Ajit Pawar : अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...